एक्स्प्लोर

MI vs KKR IPL 2020 : डि कॉकची स्फोटक खेळी! मुंबईचा कोलकातावर 8 गडी राखून विजय; पॉईंट टेबलमध्ये मुंबई अव्वलस्थानी

MI vs KKR: आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यामध्ये अबू धाबी येथील शेख जाएद स्टेडियमवर सामना खेळविण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला आहे.

IPL 2020 MI vs KKR : सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने 148 धावांपर्यंत मजल मारली होती. या विजयासह मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये 12 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे.

कोलकाताने दिलेलं 148 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात दमदार झाली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटोन डी कॉकने चांगली सुरुवात केली. मात्र, लयीत खेळत असताना कर्णधार रोहित शर्माने झेलबाद झाला. रोहितने 36 चेंडूत 35 धावा केल्या. रोहित जरी संथ खेळत असला तरी डी कॉक फटकेबाजी सुरुच होती. रोहितनंतर आलेला सूर्यकुमार यादवही अवघ्या 10 धावा करुन परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि डी कॉकने मुंबईला विजय मिळवूनचं मैदान सोडलं. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

गूगलचा घोळ : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा झाली या प्रसिद्ध खेळाडूची पत्नी तत्पूर्वी, कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठी स्वस्तात बाद झाला. नितीश राणाला लौकिकाला साजेशी खेळी करत आली नाही. 5 धावा करून तो बाद झाला. शुबमन गिल देखील चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 21 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही 4 धावांवर बाद झाला. राहुल चहरने 2 चेंडूमध्ये 2 बळी घेत कोलकाताला मोठा धक्का दिला.

फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल आजही फेल ठरला.त्याने अवघ्या 12 धावा केल्या. निम्मा संघ लवकर तंबूत परतल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत संघाला 148 पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 53 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने दोन गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाइल आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
Abu Azmi : अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
Gold Rate Today: सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Father Kills Daughter : चाचणी परिक्षेत कमी गुण, वडिलांकडून अमानुष मारहाण; मुलीचा मृत्यू
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
Bhaskar Jadhav PC : भास्कर जाधवांनी समर्थकांना बोलावलं,मोठी जबाबदारी अंगावर घेतली,नाराजीबाबत म्हणाले
City 60 Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2025 : 11 AM : ABP Majha
Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
Abu Azmi : अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
Gold Rate Today: सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
Iran-Israel War: मिसाईल, बाँम्बवर्षाव थांबत नसतानाच इराणनं आणखी एका मोसादच्या हेराला पकडून सुळावर चढवलं!
मिसाईल, बाँम्बवर्षाव थांबत नसतानाच इराणनं आणखी एका मोसादच्या हेराला पकडून सुळावर चढवलं!
संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का? संदीप देशपांडे संतापले, अबू आझमींनाही कानशि‍लात लगावू म्हणाले
संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का? संदीप देशपांडे संतापले, अबू आझमींनाही कानशि‍लात लगावू म्हणाले
Accident News : जुन्या वर्सोवा पुलावर भीषण अपघात, टँकर कठडा तोडून थेट खाडीत कोसळला, चालकाचा मृत्यू
जुन्या वर्सोवा पुलावर भीषण अपघात, टँकर कठडा तोडून थेट खाडीत कोसळला, चालकाचा मृत्यू
America Attack on Iran: 'इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार', अमेरिकेच्या शक्तीशाली हवाई हल्ल्यानंतर बलाढ्य देशानं इस्त्रायल, अमेरिकेची डोकेदुखी वाढवली
'इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार', अमेरिकेच्या शक्तीशाली हवाई हल्ल्यानंतर बलाढ्य देशानं इस्त्रायल, अमेरिकेची डोकेदुखी वाढवली
Embed widget