Delhi Capitals Schedule : दिल्लीकडे यंग आणि जबरदस्त खेळाडूंचा भरणा, जाणून घ्या कधी आहेत सामने
आयपीएलच्या या मोसमात युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दिल्लीचे संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमाची तयारी पूर्ण झाली आहे. आयपीएलच्या या मोसमात युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. प्रशिक्षक रिकी पाँटिंग असलेल्या दिल्लीच्या टीमनं मागील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. यंदा संघात काही नवी नावं जुळली गेली आहेत. त्यात महत्वाचं नाव म्हणजे अजिंक्य रहाणे. रहाणे यंदा दिल्लीकडून खेळणार असल्याने दिल्लीची फलंदाजीची बाजू मजबूत होणार आहे.
सोबतीला कर्णधार श्रेयस, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी, शिखर धवन, हेटमायर अशी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. तर आर अश्विन, इशांत शर्मा, कॅसिगो रबाडा, अमित मिश्रा, किमो पॉल अशी मजबूत टीम दिल्लीकडे आहे.
दिल्लीचे संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
20 सितंबर - रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब
25 सितंबर - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स29 सितंबर - मंगळवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
3 ऑक्टोबर - शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
5 ऑक्टोबर - सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
9 ऑक्टोबर - शुक्रवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
11 अक्टूबर - रविवार - मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स14 ऑक्टोबर - बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
17 ऑक्टोबर - शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
20 ऑक्टोबर - मंगळवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब
24 ऑक्टोबर - शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 ऑक्टोबर - मंगळवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
31 ऑक्टोबर - शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियंस
2 नोव्हेंबर - सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
तीन महत्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं युद्ध खरंतर दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारखे पर्यायही समोर आले. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आय़ोजन करण्याचं बीसीसीआयनं पक्क केलं. यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.