एक्स्प्लोर
Advertisement
अल्झारी जोसेफचा विक्रम, सहा विकेट्स घेत आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सकडून अलझारी जोसेफने केवळ 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याला राहुल चहरने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.
हैदराबाद : अल्झारी जोसेफने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 40 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादसमोर ठेवलेल्या 137 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 96 धावांवरच आटोपला. मुंबई इंडियन्सच्या अलझारी जोसेफने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. अल्झारीने 12 धावा देत 6 बळी घेतले. यापूर्वी 2008 च्या सत्रात राजस्थानकडून खेळताना सोहेल तन्वीरने चेन्नईविरुद्ध 14 धावा देत 6 बळी घेतले होते. त
Match 19. It's all over! Mumbai Indians won by 40 runs https://t.co/MIxyuhq8wq #SRHvMI #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2019
गेल्या सामन्यातील हिरो वॉर्नर (15) आणि बेअरेस्ट्रो (16) धावांवर लवकरच तंबूत परतले. तर विजय शंकर केवळ 5 धावांवर बाद झाला. यानंतर आलेला मनीष पांडे (15) तर युसूफ पठाण शून्यावर बाद झाले. दीपक हुडाने सर्वाधिक 20 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून अल्झारी जोसेफने केवळ 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याला राहुल चहरने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादसमोर 137 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हैदराबादच्या प्रभावी आक्रमणासमोर मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं होतं. त्यामुळे मुंबईला 20 षटकांत सात बाद 136 धावांचीच मजल मारता आली. कायरन पोलार्डनं मुंबईकडून सर्वाधिक 46 धावांचं योगदान दिलं. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलनं दोन तर भुवनेश्वर कुमार, रशिद खान, मोहम्मद नबी आणि संदीप शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतली.
अल्झारी जोसेफचा विक्रम
मुंबई इंडियन्सच्या अलझारी जोसेफने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. अल्झारीने 12 धावा देत 6 बळी घेतले. यापूर्वी 2008 च्या सत्रात राजस्थानकडून खेळताना सोहेल तन्वीरने चेन्नईविरुद्ध 14 धावा देत 6 बळी घेतले होते. तर एडम झम्पाने पुण्याकडून खेळताना हैदराबादविरुद्ध 19 धावा देत 6 बळी घेतले होते. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या पहिल्या तीनमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे . कुंबळेने राजस्थानविरुद्ध बंगलोरकडून खेळताना 5 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर पाचव्या स्थानी असलेल्या इशांत शर्माने 12 धावा देत 5 गडी बाद केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement