एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोईन अलीने एका षटकात कुटल्या 27 धावा, कुलदीप यादवला भरमैदानात रडू कोसळलं

मोईन अलीला सोळाव्या षटकात 4,6,4,6,6 अशा धावा दिल्यामुळे बंगळुरुची गाडी 122 वरुन एका षटकातच 149 धावांवर पोहचली. कुलदीपने टाकलेल्या चार षटकांमध्ये बंगळुरुच्या फलंदाजांनी 59 धावा ठोकल्या.

मुंबई : टीम इंडियाचा मॅचविनर फिरकीपटू कुलदीप यादवला आयपीएलमधील सामन्यात भरमैदानातच रडू कोसळलं. मोईन अलीला एका षटकात 27 धावा दिल्यामुळे कुलदीपच्या अश्रूंचा बांध फुटला. कुलदीपला चार षटकात 59 धावा ठोकून फलंदाजांनी अक्षरशः धुतला शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून दहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरुने या सामन्यात कोलकात्यासमोर 214 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला पाच बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली. आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यात मोठा हादरा बसला. विशेष म्हणजे विश्वचषकाला अवघा सव्वा महिना उरल्यामुळे कुलदीप बावचळून गेला. मोईन अलीला सोळाव्या षटकात 4,6,4,6,6 अशा धावा दिल्यामुळे बंगळुरुची गाडी 122 वरुन एका षटकातच 149 धावांवर पोहचली. कुलदीपने टाकलेल्या चार षटकांमध्ये बंगळुरुच्या फलंदाजांनी 59 धावा ठोकल्या. यापैकी 50 धावा तर केवळ षटकार आणि चौकारांच्या जोरावरच करण्यात आल्या होत्या. वाईट कामगिरीमुळे निराश झालेल्या कुलदीप यादवच्या भावनांचा बांध फुटला. इतर खेळाडूंनी कुलदीपला कसंबसं शांत केलं. मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळला होता. 20 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर कुलदीपच्या मिस फील्डिंगचा फटका पुन्हा संघाला बसला. पाचव्या चेंडूवर तर कुलदीपच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणानंतर कोहलीने जल्लोष सुरु केला होता. कुलदीपच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे कोहलीचं आयपीएलमध्ये पाचवं शतक पूर्ण झालं. त्यामुळे एकीकडे स्टेडिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरु असताना, कुलदीप मात्र कोपऱ्यात रडत होता. कुलदीपच्या नावे लज्जास्पद विक्रम कुलदीप यादवच्या नावे आयपीएलमध्ये लज्जास्पद विक्रम जमा झाला आहे. कुलदीप हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणारा भारतीय स्पिनर ठरला आहे. 2016 मध्ये कर्ण शर्माने 57 धावा देण्याचा विक्रम केला होता, तो आता कुलदीपच्या नावे जमा झाला आहे. इमरान ताहिरने 2016 मध्ये 59 धावा, तर रवींद्र जाडेजाने 2017 मध्ये 59 धावा दिल्या आहेत. कोलकात्याकडून नितिश राणाने नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेलने 25 चेंडूत 65 धावा फटकावल्या. या दोघांनी 118 धावांची झुंजार भागीदारी रचून कोलकात्याला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न दहा धावांनी दूर राहिला. कोलकात्याचा हा गेल्या चार सामन्यातला सलग चौथा पराभव ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget