एक्स्प्लोर

IPL: फायनलनंतर खेळाडूंवर पैशाचा पाऊस, कोणाला किती रक्कम?

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने फायनल लढतीत केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट राखून विजय मिळवला.या सामन्यानंतर विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं.

मुंबई: आयपीएल 11 च्या अंतिम सामन्यानंतर विजयी आणि उपविजयी संघांवर पैशांचा पाऊस पडत आहे. याशिवाय खेळाडूंनी वैयक्तिक बक्षीसांचीही लयलूट केली आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने फायनल लढतीत केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 12.50 कोटी रुपयाचं इनाम देण्यात आलं. पर्पल कॅप किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायने सर्वोत्तम गोलंदाजाचा किताब पटकावला. टायने सर्वाधिक 24 विकेट्स घेत पर्पल कॅपचा मान मिळवला. टायला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. ऑरेंज कॅप सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसने यंदा उत्तम कर्णधाराची भूमिका तर बजावलीच, शिवाय तो यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. 735 धावांसह ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या विल्यमसनने 10 लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत यंदाचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अर्थात उदयन्मुख खेळाडू ठरला. त्याला 10 लाख रुपयांचं इनाम मिळालं. स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्ड विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर सोबत स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्डचाही किताब मिळवला. त्याला या पुरस्कारासाठीही 10 लाख रुपये तर दोन्ही पुरस्काराचे मिळून 20 लाख रुपये मिळाले. मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण यंदाचा मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर अर्थात सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. त्यालाही 10 लाखाचं बक्षीस मिळालं. नयी सोच सीजन अॅवॉर्ड आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला नयी सोच सीजन अॅवॉर्ड मिळाला. सर्वोत्तम झेल दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळलेल्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्डला परफेक्ट कॅच ऑफ द सीजन अर्थात सर्वोत्तम झेलचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम झेलसाठी त्याला 10 लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं. फेयर प्ले अॅवॉर्ड रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फेयर प्ले अॅवॉर्ड मिळाला. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आलं. बेस्ट ग्राऊंड अॅवॉर्ड सर्वोत्तम मैदान अर्थात बेस्ट ग्राऊंडचा पुरस्कार पंजाब क्रिकेट असोसिएशनला मिळाला. या मैदानावर केवळ 7 सामनेच खेळवण्यात आले होते. तरीही या मैदानाने बाजी मारली. पंजाब क्रिकेट असोसिएशनने 25 लाख रुपयाचं इनाम पटकावलं. बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझन कोलकात्याच्या ईडन गार्डनला बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला. त्यांना 50 लाख रुपय देऊन गौरवण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkoper Hording Collapsed : टॅक्सी, टेम्पो, कारचा चक्काचूर; दुर्घटनेनंतरची भीषण दृश्यChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi Varanasi : मोदींनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा भरला  अर्ज : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Embed widget