एक्स्प्लोर
वेस्ट इंडिजनंतर भारत श्रीलंका दौऱ्यावर, संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 कसोटी, 5 वन डे आणि एक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे. वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल. श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नव्या मुख्य प्रशिक्षकासोबत जाणार आहे.
आणखी वाचा























