एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा विजय, पाकिस्तानला चारली धूळ
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत पहिल्या 3 फलंदाजांना अवघ्या 30 धावांमध्ये माघारी धाडलं. मात्र बिसमाहने 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची तर निदा डारने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 52 धावा करत संघाची धावसंख्या 133 वर पोहोचवली.
गयाना : महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. विजयासाठी 134 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने 7 विकेट्स आणि 6 चेंडू राखत विजय मिळवला. मिताली राजने शानदार 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला वीस षटकांत सात बाद 133 धावांवर रोखलं. पाकिस्तानच्या बिस्मा मारुफ आणि निदा डारनं या सामन्यात झुंजार अर्धशतकं झळकावली. त्या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारीही रचली. पण भारताच्या हेमलतानं त्या दोघींना माघारी धाडून पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पूनम यादवनं दोन आणि अरुंधती रेड्डीनं एक विकेट काढून आपली कामगिरी चोख बजावली.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत पहिल्या 3 फलंदाजांना अवघ्या 30 धावांमध्ये माघारी धाडलं. मात्र बिसमाहने 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची तर निदा डारने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 52 धावा करत संघाची धावसंख्या 133 वर पोहोचवली.
या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मिताली राज आणि स्मृती मानधनाने सावध सुरुवात केली. स्मृती 24 धावा करून तंबूत परतली. तर मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारी जेमीना रॉड्रिक्सने या सामन्यात 16 धावा केल्या. मिताली राजने 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. विजयला 8 धावा आवश्यक असताना ती बाद झाली. शेवटी कर्णधार हरमनप्रीत कौर (14) आणि वेदा कृष्णमूर्तीने (8) विजयावर शिक्कामोर्तब केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement