(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022 : भारतीय महिला टेबल टेनिस टीम स्पर्धेतून बाहेर, महिला हॉकी टीमचा दुसरा विजय, असा राहिला शनिवारचा दिवस
India in CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत 2022 (Commonwealth Games 2022) भारतीय महिला हॉकी टीमला दुसरा विजय मिळाला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चढउतार असणारा ठरला.
India in CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत 2022 (Commonwealth Games 2022) महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी टीमला दुसरा विजय मिळाला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चढउतार असणारा ठरला. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये एक पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. भारतीय हॉकी संघाने दुसरा विजय मिळत चांगली स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर महिला टेबल टेनिस टीमला (Indian Women Table Tennis Team) मात्र स्पर्धेत नशीब उजळता आलेलं नाही. भारतीय महिला टेबल टेनिस टीम (Indian Women Hockey Team) स्पर्धेतून बाहेर पडली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
भारतीय संघाचा मलेशियाकडून पराभव
भारताची स्टार खेळाडू मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टेबल टेनिस संघाला ग्रुप मॅचमध्ये विजय मिळाला होता. मात्र शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या संघाकडून भारतीय महिला टेबल टेनिस संघाला पराभव पत्करावा लागला आहे. अंतिम आठच्या सामन्यात भारताला मलेशियाच्या कठोर आव्हानाला सामोरं जावं लागलं. यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यामुळे कॉमनवेल्थ स्पर्धेतून महिला टेबल टेनिस संघ बाहेर पडला आहे.
मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
मीराबाई चानू (Mirabai Chanu) हीने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक (Mirabai Wins Gold medal) मिळवून दिलं आहे.मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. यावेळी मीराबाईने एकूण (113+88) 201 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ (India Women's Hockey Team) सातत्यानं दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घानाला धुळ चाखल्यानंतर भारतीय महिला संघानं वॉल्सचाही पराभव केलाय. वॉल्सविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा पुढचा सामना इंग्लंडशी (2 ऑगस्ट) खेळणार आहे.