एक्स्प्लोर
भारतीय महिला क्रिकेट संघाकडून इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा, मालिकेत विजयी आघाडी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा अवघ्या 161 धावांत खुर्दा उडवला. इंग्लंडकडून स्कायव्हरने 85 धावांची एकहाती झुंज दिली. भारताकडून झुलान गोस्वामी आणि शिखा पांडे या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. लेग स्पिनर पूनम यादवनं दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली.

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यावर भारतीय महिलांनी पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवत तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा अवघ्या 161 धावांत खुर्दा उडवला. इंग्लंडकडून स्कायव्हरने 85 धावांची एकहाती झुंज दिली. भारताकडून झुलान गोस्वामी आणि शिखा पांडे या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. लेग स्पिनर पूनम यादवनं दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. इंग्लंडच्या अवघ्या 161 धावांचा पठलाग करताना सलामीच्या स्मृती मानधनाने पूनम राऊतच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची रचली. नंतर मिताली राजच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने 63 धावांची, पूनमनं 32 आणि मितालीनं 47 धावांची खेळी उभारली. पहिल्या वन डे सामन्याच भारताची विजयी सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा अख्खा डाव 41 षटकात अवघ्या 136 धावांत गुंडाळून, मुंबईतल्या पहिल्या वन डेत 66 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. संबंधित बातम्या मुंबईतील पहिल्या वन डेत भारताकडून इंग्लंडचा धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी भारतीय खेळाडूंची पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, काळ्या फिती बांधून निषेध
आणखी वाचा























