एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लग्नात व्यस्त असलेल्या कोहलीला झटका, मात्र रोहितचा फायदा
तर ट्वेण्टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी रँकिंगमध्ये मुसंडी मारली आहे.
दुबई : जगातील टॉप फलंदाज आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेत न खेळल्याने मोठं नुकसान झालं आहे. लग्नात व्यस्त असलेल्या विराट कोहलीची आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
टी-20मध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तर ट्वेण्टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी रँकिंगमध्ये मुसंडी मारली आहे.
ICC टी-20 क्रमवारीत भारताची थेट दुसऱ्या स्थानी झेप!
अॅरॉन फिन्च नंबर वन फलंदाज
ट्वेण्टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. लग्नासाठी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेतून माघार घेतली होती. पण त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिन्चला मिळाला. तो आता अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस आहे. तर आता विराट कोहली तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
एक सामना न खेळल्याने दोन अंक कमी
कोहली आणि फिन्च यांच्यात आठ रेटिंग अंकांचंच अंतर आहे. एक सामना न खेळल्याने खेळाडू आपल्या रेटिंग अंकांपैकी दोन टक्के गमावतात. त्यामुळे कोहलीचे रेटिंग अंक 824 वरुन 776 झाले आहेत. तर अॅरॉन फिन्चच्या खात्यात 784 अंक जमा आहेत.
या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं अंडर-19 विश्वचषकात खेळणार!
राहुल आणि रोहितची मोठी झेप
केएल राहुलने या मालिकेत 154 धावा केल्या, परिणामी त्याने मोठी झेप घेतली. 23 व्या स्थानावरुन तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मालिकेत 162 धावा केल्याचा फायदा हंगामी कर्णधार रोहित शर्मालाही मिळाला. काही अंकांनी वर सरकत तो चौदाव्या स्थानावर विराजमान झाला आहे. रोहितने इंदूरमधील दुसऱ्या सामन्यात 118 धावांची खेळी केली होती. तर श्रीलंकन फलंदाजांमध्ये कुसल परेरा 30व्या आणि उपुल थरंगा 105व्या स्थानावर पोहोचला आहे.
धोनीने तुटलेल्या बॅटने विजयी चौकार मारला
टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर
श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका भारतीय संघाने 3-0 अशी खिशात घातली आणि संघाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. टीम रँकिंगमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्धच्या क्लीन स्वीपचा फायदा मिळाला. त्यामुळे संघाच्या खात्यात आता 121 अंक जमा झाले आहेत. या अंकांमुळे टीम इंडियाने इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजला मागे टाकत दुसरं स्थान मिळवलं आहे. भारतीय संघ या मालिकेआधी पाचव्या स्थानावर होता. तर पाकिस्तान 124 अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement