पृथ्वी शॉ ठरला मॅन ऑफ द सीरिज, या 'खास' यादीत समावेश
दोन कसोटी सामन्यांमधल्या तीन डावांमध्ये मिळून 118.50च्या सरासरीनं 237 धावांचा रतीब घातला. पृथ्वीनं राजकोट कसोटीत पदार्पणात 134 धावांची खेळी उभारली होती.
हैदराबाद : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा दहा विकेट्सने धुव्वा उडवला. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पृथ्वी शॉ या युवा खेळाडूनं आपल्या फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. पृथ्वी शॉचं लागोपाठ दुसऱ्या कसोटी डावात शतक झळकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण या मुंबईकर फलंदाजानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.
या मालिकेत 'मॅन ऑफ द सीरिज'चा किताब पृथ्वी शॉला बहाल करण्यात आला. पहिल्या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सीरिजचा किताब पटकावणारा पृथ्वी भारताचा चौथा तर जगातील दहावा खेळाडू ठरला आहे.
दोन कसोटी सामन्यांमधल्या तीन डावांमध्ये मिळून 118.50च्या सरासरीनं 237 धावांचा रतीब घातला. पृथ्वीनं राजकोट कसोटीत पदार्पणात 134 धावांची खेळी उभारली होती. हैदराबाद कसोटीत त्यानं 70 आणि नाबाद 33 धावांच्या खेळी केल्या.
याशिवाय वेस्ट इंडिज विरुद्ध भारतात खेळल्या गेलेल्या मागीत तीन मालिकांमध्ये कसोटीत पदार्पण केलेले खेळाडू मॅन ऑफ सीरिज बनले आहेत. 2011मध्ये आर अश्विन आणि 2013मध्ये रोहित शर्मा आणि आता पृथ्वी शॉ पदार्पणाच्या मालिकेत मॅन ऑफ द सीरिज ठरले.
हे खेळाडू पर्दापणात ठरले होते 'मॅन ऑफ द सीरिज'
सौरव गांगुली (भारत,1996)
जॅक्स रुडॉल्फ (दक्षिण आफ्रिका, 2003)
स्टुअर्ट क्लार्क (ऑस्ट्रेलिया, 2006)
अजंता मेंडिस (श्रीलंका, 2008)
रविचंद्रन अश्विन(भारत, 2011)
वर्न फिलँडर(दक्षिण आफ्रिका, 2011)
जेम्स पॅटिन्सन (ऑस्ट्रेलिया, 2011)
रोहित शर्मा (भारत, 2013)
मेहदी हसन (बांगलादेश, 2016)
पृथ्वी शॉ वी (भारत, 2018)
संबंधित बातम्या
भारताकडून विंडिंजचा 10 विकेट्सने धुव्वा, मालिकाही जिंकली
पृथ्वी शॉच्या मॅनेजमेंट टीमकडून स्विगी, फ्रीचार्जकडे 1 कोटींची मागणी
पदापर्णात सामनावीर ठरलेला पृथ्वी शॉ सहावा भारतीय खेळाडू
विंडीज गोलंदाजांची ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा, खणखणीत शतकासमोर लोंटागण!