एक्स्प्लोर

IndvsSL : विराट कोहलीचं विसावं शतक पूर्ण

भारत आणि श्रीलंका संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून विराट कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममधील तिसऱ्या कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शानदार शतक झळकावलं. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे विसावं तर या मालिकेतलं सलग दुसरं शतक ठरलं. विराटने 110 चेंडूंचा सामना करताना चौदा चौकारांसह शतक साजरं केलं. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 175 पेक्षा जास्त धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी सलामीवीर मुरली विजयने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक साजरं केलं. त्याने 170 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारली. तर विराट 14 चौकारांसह 94 धावांवर खेळत आहे. सलामीचा शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विजय आणि कर्णधार  कोहलीनं खेळाची सूत्रं आपल्या हातात घेत टीम इंडियाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं आहे. IndvsSL : विराट कोहलीचं विसावं शतक पूर्ण टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होत असलेल्या या कसोटीत विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. मात्र धवनला मोठी खेळी करता आली नाही. धवन 23 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मग मुरली विजयच्या साथीला चेतेश्वर पुजारा आला, पण पुजाराही जास्त वेळ मैदानात थांबला नाही. त्यानेही 23 धावाच केल्या. धवनला परेराने तर पुजाराला गॅमेजने माघारी धाडलं. धवन-पुजार माघारी परतल्यानंतरही मुरली विजयने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने संयमी खेळी करत कर्णधार विराट कोहलीसोबत शतक पूर्ण केलं. भारतीय संघात दोन बदल भारताने संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि मोहम्मद शमी संघात परतले आहेत, तर के एल राहुल आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं. तर श्रीलंकेनेही त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. लक्षन संदाकन, रोशन सिल्वा आणि धनंजय डीसिल्व्हा यांना संघात स्थान देण्यात आला आहे, तर थिरीमन्ने, शनाका आणि रंगना हेरथ यांना वगळण्यात आलं आहे. टीम इंडियाने दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याआधी, कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला केवळ अंधुक प्रकाशामुळेच विजयाने हुलकावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली कसोटीवर विराटसेनेच्याच वर्चस्वाची अपेक्षा आहे. पण या कसोटीसाठी सलामीचा तिढा सोडवायचा कसा हा प्रश्न विराट कोहली समोर  होता. कारण वैयक्तिक कारणास्तव दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा शिखर धवन तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात परतला. पण धवनच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मुरली विजयने नागपूर कसोटीत शतक ठोकलं होतं. त्यामुळे धवनच्या साथीला लोकेश राहुल की विजय यापैकी कुणाला संधी द्यायची हा प्रश्न होता.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Trade IPL 2027 : 25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
Ind vs SL Shubman Gill : श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget