एक्स्प्लोर
डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉकची शतकी पारी, दक्षिण आफ्रिकेचं टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर
टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार केला. विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला बाद करुन जाडेजानं 200 विकेट्स पूर्ण केल्या.
विशाखापट्टणम : डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉकच्या दमदार शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेनं विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टीम इंडियाच्या सात बाद 502 या धावसंख्येसमोर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर आठ बाद 385 धावांची मजल मारली होती.
तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर डीन एल्गरने कसोटी कारकीर्दीतलं 12वं शतक साजरं केलं. त्याने 18 चौकार आणि चार षटकारांसह 160 धावांची खेळी उभारली. तर क्विंटन डी कॉकनं 111 धावांचं योगदान दिलं. डी कॉकचं हे दहावं कसोटी शतक ठरलं.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत पहिले दोन दिवस टीम इंडियाने गाजवले. रोहित शर्मा आणि मयांक अगवालच्या त्रिशतकी सलामीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी दैना केली. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकीसमोर विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची दैना उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची तीन बाद 39 अशी अवस्था झाली आहे.
रविंद्र जाडेजाचा कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार
टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार केला. विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला बाद करुन जाडेजानं 200 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीत 200 विकेट्स घेणारा जाडेजा हा भारताचा दहावा गोलंदाज ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement