एक्स्प्लोर

INDvsENG : इंग्लंडचा दणदणीत विजय, बटलरची शानदार खेळी, मॉर्गनचा अनोखा विक्रम!

india vs england t20 : तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाला सहज नमवत पुन्हा मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने हा विजय साजरा केला.  कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं होतं.

INDvsENG : भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाला सहज नमवत पुन्हा मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने हा विजय साजरा केला.  कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद 83 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. त्याला बेअरस्टोने नाबाद 40 धावा करत चांगली साथ दिली. या विजयामुळे इंग्लंडने टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

157 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही.   जेसन रॉयला 9 धावांवर युजवेंद्र चहलने बाद केले. त्यानंतर डेव्हिड मलान 18 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर बटलर आणि बेअरस्टोनं कुठलीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला.  बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या तर बेअरस्टोने 28 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.  

त्याआधी टॉस जिंकून इंग्लंडने  टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा उभारल्या. पहिल्या सामन्यासारखंच या सामन्यातही टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. लोकेश राहुल शून्यावर बाद झाला तर दोन सामन्यांच्या विश्रातीनंतर आलेल्या रोहित शर्मालाही मोठी खेळी करता आली नाही. इशान किशनही चार धावांवर बाद झाला. ऋषभ पंत 25 धावांवर धावबाद झाला. एकीकडे संघाची अवस्था बिकट असताना कर्णधार विराटने 46 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावा करत संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली. 

 इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनचा खास विक्रम
भारताविरुद्धच्या इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने खास विक्रमाची नोंद केली आहे. मॉर्गन इंग्लंडसाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. 2009 मध्ये म्हणजेच 12 वर्षांपूर्वी मॉर्गनने नेदरलँड्सविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मॉर्गन 100 किंवा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरला. या विक्रमात प्रथम क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन, दुसर्‍या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा तर, तिसर्‍या क्रमांकावर न्यूझीलंडचा रॉस टेलर आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget