एक्स्प्लोर

भारताविरुद्धच्या वन डे, टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

लंडन : टीम इंडियाविरुद्ध पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी सीरिज साठी इंग्लंड संघाची घोषणा झाली आहे. या सीरिजमध्ये फलंदाज इयॉन मॉर्गन इंग्लंड संघाचं नेतृत्व करणार आहे. तर अॅलेक्स हेल्सनेही संघात पुनरागमन केलं आहे. हेल्स आणि मॉर्गन यांनी सुरक्षा कारणांमुळे बांगलादेशात झालेल्या वन डे सीरिजमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे दोघांनीही आता पुनरागमन केलं आहे. तर बांगलादेश दौऱ्यात विश्रांती दिल्यानंतर जो रुटचाही संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचे जलद गोलंदाज बेन डकेट, स्टीव्हन फिन, आणि जेम्स विंस कसोटी मालिकेनंतर मायदेशात परतणार आहेत. मॉर्गनच्या नेतृत्वात आणि मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने गेल्या 12 सामन्यांपैकी 9 सामन्यांत विजय मिळवला आहे. इंग्लंडचा संघ भारताच्या या दौऱ्यात तीन वडे आणि तीन ट्वेंटी-ट्वेंटी खेळणार आहे. पहिला वन डे पुण्यात 12 जानेवारीला खेळवला जाईल. सीरिजच्या सुरुवातीला इंग्लंडचा संघ 10 जानेवारीला भारत 'ए' विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीही सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण धोनीने ऑक्टोबरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे धोनी सरावासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा वन डे संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, लियाम डासन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रुट, जेसन रॉ, बेन स्टोक्स, डेव्हिड वेली आणि ख्रिस वोक्स. इंग्लंडचा टी-20 संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डासन, अलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रुट, जेसन रॉ, बेन स्टोक्स आणि डेव्हिड वेली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार
पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, नेटकरी संतापले
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?

व्हिडीओ

Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report
Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
Embed widget