एक्स्प्लोर

IndvsEng : पहिल्या डावात इंग्लंडच्या सर्वबाद 246 धावा

सॅम करनने मोईन अलीच्या साथीने 81 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला.

साऊदम्पटन: सॅम करनने आधी मोईन अली आणि मग स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीने रचलेल्या भागिदाऱ्यांनी साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात सर्व बाद 246 धावांची समाधानकारक मजल मारुन दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी एका क्षणी इंग्लंडची सहा बाद 86 अशी दाणादाण उडवली होती. पण सॅम करनने मोईन अलीच्या साथीने 81 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. मग त्याने ब्रॉडच्या साथीने 63 धावांची भागीदारी करुन इंग्लंडच्या डावाला सर्व बाद 246 असा आकार दिला. करनने आठ चौकार आणि एक षटकारासह 78 धावांची खेळी उभारली. मोईन अलीने 40, तर स्टुअर्ट ब्रॉडने 17 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन, तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. हार्दिक पंड्यानं एक विकेट काढली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या साऊदम्प्टन कसोटीत, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरली. भारताने या कसोटीसाठी नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीतला विजयी संघ कायम राखला. तब्बल 38 व्या सामन्यानंतर कोहलीने पहिल्यांदाच संघ कायम ठेवला आहे. यापूर्वी प्रत्येक कसोटीनंतर कोहली संघात काही ना काही बदल करत होता. पण या कसोटीच्या निमित्ताने पहिल्यादांच त्याने संघ कायम ठेवला आहे. इंग्लंडने या कसोटीसाठी ख्रिस वोक्सऐवजी सॅम करन आणि ऑलिव्हर पोपऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे. साउदम्प्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर हा सामना आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे साउदम्प्टन कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण या दोघांनाही अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळालेली नाही. भारत: शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त तीन सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता.

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर

संबंधित बातम्या 

टीम इंडियाचा विजय केरळ पूरग्रस्तांना समर्पित; सामन्याचं मानधनही दिलं   

दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय  

रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा नंबर वन! 

विराट कोहली सचिनचा 'हा' विक्रम मोडण्याच्या तयारीत 

महत्त्वाच्या बातम्या

Team India : मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget