एक्स्प्लोर

IND VS NZ 3rd ODI Update : बीसीसीआयने नाणेफेकची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाचा खेळ सुरू; हॅमिल्टनमध्ये दिवसभराचा धडकी भरवणारा हवामान अंदाज

IND VS NZ 3rd ODI Weather Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पुन्हा एकदा पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

IND VS NZ 3rd ODI Weather Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पुन्हा एकदा पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हॅमिल्टनमध्ये पावसाचे आगमन झाल्याने खेळपट्टी पुन्हा एकदा कव्हर्सने झाकण्यात आली आहे. त्यामुळे नाणेफेक आणि सामना सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. आधीच मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. आता तिसऱ्या सामन्यातही पावसाचा खेळ सुरू झाल्याने क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीचा वापर करावा लागला होता. मात्र, दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

हॅमिल्टनमध्ये पावसाचा खेळ सुरूच; सामना रद्द होण्याचीही शक्यता

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हॅमिल्टनमधील हवामान स्वच्छ राहील आणि चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हवामानाच्या अंदाजाने या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी दुपारी हॅमिल्टनमध्ये पावसाची 96 टक्के शक्यता असून तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सकाळी पावसाची शक्यता 100 टक्के, तर रात्री 90 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. मात्र, सामन्याच्या निर्धारित वेळेतही पावसाचा धोका कायम आहे.

सामन्यादरम्यान पावसाची शक्यता :

- दुपारी 3 वाजता – 73 टक्के
- दुपारी 4 वाजता – 80 टक्के
- दुपारी 5 वाजता – 80 टक्के
- संध्याकाळी 6 वाजता – 80 टक्के
- संध्याकाळी 7 वाजता – 80 टक्के
- रात्री 8 वाजता – 49 टक्के
- रात्री 9 वाजता – 70 टक्के
- रात्री 10 वाजता – 76 टक्के
- रात्री 11 वाजता – 67 टक्के

या अंदाजामुळे तिसरा सामना पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सामना लांबणीवर पडू शकतो. इतकेच नव्हे, तर एकही चेंडू न टाकता सामना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

खेळपट्टी झाकल्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा? 

पावसामुळे खेळपट्टी दीर्घकाळ कव्हर्सखाली ठेवल्यास तिच्या पृष्ठभागावर ओलावा टिकून राहू शकतो. सूर्यप्रकाश आणि हवेचा संपर्क कमी झाल्यामुळे खेळपट्टी लवकर कोरडी होण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत खेळपट्टीचा पृष्ठभाग काहीसा मऊ आणि दमट राहू शकतो. याचा फायदा प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांना मिळण्याची शक्यता आहे. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर सीम मूव्हमेंट मिळू शकते. त्यामुळे फलंदाजांसाठी सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा काढणे आव्हानात्मक ठरू शकते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती खेळ सुरू होण्याच्या वेळीच स्पष्ट होईल.

हे ही वाचा -

Suryakumar Yadav News : सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार; हार्दिक-मॅक्सवेलसह स्टार्सची फौज सज्ज! संघात कोणाकोणाला संधी? पाहा 16 खेळाडूंचा तगडा Squad

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लाोटांगण, अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय
वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लाोटांगण, अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Vaibhav Sooryavanshi : 28 बॉलमध्ये विक्रमी शतक, वैभव सूर्यवंशी वादळाप्रमाणं UAE च्या गोलंदाजांवर तुटून पडला, षटकारांचा पाऊस सुरुच
28 बॉलमध्ये विक्रमी शतक, वैभव सूर्यवंशी वादळाप्रमाणं UAE च्या गोलंदाजांवर तुटून पडला, बेबी बॉसचा चौकार-षटकारांचा पाऊस सुरुच
Priyansh Arya News : 6,6,6,6,6,6... 19 षटकार, 36 चेंडूंत शतक, 68 चेंडूंत 181 धावा! प्रियांश आर्यचं वादळ, ख्रिस गेलचा 'तो' विक्रम उद्ध्वस्त, घातला रेकॉर्डचा रतीब
6,6,6,6,6,6... 19 षटकार, 36 चेंडूंत शतक, 68 चेंडूंत 181 धावा! प्रियांश आर्यचं वादळ, ख्रिस गेलचा 'तो' विक्रम उद्ध्वस्त, घातला रेकॉर्डचा रतीब
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget