India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. आज सकाळी 9.30 वाजता टॉस होईल. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे,
भारतीय संघ 1999 साली चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानकडून 12 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यानंतर संघाने 8 सामने या मैदानावर खेळले त्यातील 5 सामने जिंकले असून दोन सामने ड्रॉ झाले.
चेपॉक स्टेडियमचे पिच पाहता भारतीय संघ पहिल्या सामन्यात तीन स्पीनर्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकते. आर अश्विनसह वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मिडल ऑर्डर सांभाळतील. विकेटकिपींगची जबाबदारी ऋषभ पंतला मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य संघ
भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंड - रोरी बर्न्स, डोमनिक सिब्ले, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स एंडरसन आणि जोफ्रा आर्चर
संबंधित बातम्या :