IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत करुन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चाहत्यांना भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.


गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया क्लीनस्विप करु शकणार नाही. गंभीरच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारत 3-0 किंवा 3-1 ने जिंकू शकतो. त्याचसोबत गंभीरचं म्हणणं आहे की, कोणताहा कसोटी सामना ड्रॉ होणार नाही. सर्व सामन्यांचा रिझल्ट मिळले. फक्त पाऊस पडला नाही पाहिजे. दरम्यान, कसोटी मालिकेतील पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये पहिले दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. तर शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळवले जातील.


IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या


कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात


पहिला सामना : 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई)
दुसरा सामना : 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई)
तिसरा सामना : 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
चौथा सामना : 4 मार्च ते 8 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)


टी-20 सीरीज :


पहिला सामना : 12 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
दुसरा सामना : 14 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
तिसरा सामना : 16 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
चौथा सामना : 18 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
पाचवा सामना : 20 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)


वन-डे सीरीज :


पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)
दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)
तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)


महत्त्वाच्या इतर बातम्या :