IND vs ENG : टीम इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार असून 5 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु, टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा दिग्गज खेळाडू खेळू शकणार नाही. इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्राहम थोर्प यांनी शुक्रवारी सांगितलं की, विकेटकीपर आणि फलंदाज असलेल्या इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेयरस्टो टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. दरम्यान, बेयरस्टोला भारता विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाबाहेर ठेवलं होतं. परंतु, आता थोर्प यांनी सांगितलं की, बेयरस्टो चेन्नईमध्ये 13 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळणार आहे.
थोर्प यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, जॉनी बेयरस्टो पहिल्या कसोटी सामन्यानंतर आपल्या संघासोबत जोडले जातील. टीम इंग्लंडकडून मिळालेल्या माहितीनुसाक, जॉनी बेयरस्टो दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर टीमसोबत जोडला जाणार होता. परंतु, आता जॉनी बेयरस्टोला दुसऱ्या कसोटी सामन्यातच मैदानावर उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जॉनी बेयरस्टोला संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं, या निर्णयामुळे संघ व्यवस्थापनावर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली होती. श्रीलंका दौऱ्यावर आपल्या मागील कसोटी मालिके दरम्यान, कर्णधार जो रुटनंतर इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा जॉनी बेयरस्टो हा दुसरा खेळाडू होता. बेयरस्टोने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 46.33 च्या सरासरीने चार डावांमध्ये 139 धावा केल्या होत्या.
वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि सैम क्युरेन यांच्यासोबत जॉनी बेयरस्टोला इंग्लंडच्या रोटेशन सिस्टमच्या स्वरुपात भारता विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात
पहिला सामना : 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई)
दुसरा सामना : 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई)
तिसरा सामना : 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
चौथा सामना : 4 मार्च ते 8 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
टी-20 सीरीज :
पहिला सामना : 12 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
दुसरा सामना : 14 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
तिसरा सामना : 16 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
चौथा सामना : 18 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
पाचवा सामना : 20 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)
वन-डे सीरीज :
पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)
दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)
तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)
महत्त्वाच्या बातम्या :
- Ranji Trophy | 'रणजी करंडक'ला कोरोनाचा फटका; 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा रद्द
- IND Vs ENG: इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय खेळपट्टीवर चालणार नाहीत, माजी क्रिकेटरचा दावा
- IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
- IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या
- IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?