एक्स्प्लोर

India vs Australia Fourth Test | मयांक अग्रवाल, ऋषभ पंतला अतिघाईचा फटका

मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांच्यावर संघाच्या फलंदाजीची धुरा असतानाच या दोन्ही खेळाडूंना काही मिनिटांसाठी सूर गवसला. पण, हे चित्र फार काळ टीकू शकलं नाही.

India vs Australia Fourth Test ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात फार चांगली दिसून आली नाही. तिसऱ्या दिवशी यजमानांचं या सामन्यावर वर्चस्व दिसून आलं चेतेश्वर पुजारा सुरुवातीलाच माघारी परतला आणि संघाला सुरुवातीच्याच काही तासांत पहिला झटका लागला. त्यामागोमागच रहाणेही तंबूत परतला. रहाणे परतल्यानंतर संघ काहीसा अडचणीत असल्याचं स्पष्टपणे कळून येत होतं.

यानंतर मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांच्यावर संघाच्या फलंदाजीची धुरा असतानाच या दोन्ही खेळाडूंना काही मिनिटांसाठी सूर गवसला. पण, हे चित्र फार काळ टीकू शकलं नाही. उपहारापूर्वी ही भागीदारी आणखी भक्कम होणार असं दिसतानाच उपहाराच्या अवघ्या काही मिनिटांनंतरच हेजलवूडच्या चेंडूवर चुकीचा फटका मारुन स्मिथच्या हाती झेल देत मयांक माघारी गेला. त्यावेळी संघाची धावसंख्या 163 वर पोहोचली होती.

अग्रवालच्या माघारी जाण्यानंतर पंत काहीसा आक्रमक खेळी खेळताना दिसला. कसोटी सामन्यामध्ये त्याचा हा आक्रमकपणा काहीशी प्रशंसा मिळवून गेला. पण, गरजेच्या ठिकाणी चेंडू सोडणंही महत्त्वाचं असल्याची बाब जणू तो विसरला आणि काही मिनिटांच्या अंतरानं दोन चौकार ठोकल्यानंतर पुन्हा त्याच आवेगात फलंदाजी करण्यासाठी पंत पुढे सरसावला आणि 23 धावा झालेल्या असताना तोसुद्धा चुकीचा फटका मारत झेलबाद झाला. त्यावेळी भारतीय संघाच्या खात्यात 186 धावा होत्या.

Video | 'संदेसे आते हैं..., गाण्याचं नवं व्हर्जन सोशल मीडियावर तुफान व्हायरल भारतीय संघातील मध्यमफळीला भक्कम करण्याच्या दिशेनं देत असतानाच पंत चूक करुन बसला. हेजलवूडच्या चेंडूवर ग्रीननं त्याचा झेल पकडला. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हे मोठं यश ठरलं पण, या विकेटमुळं भारतीय तंबूत मात्र निराशेचीच लाट पसरल्याची पाहायला मिळालं. सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात या खेळाडूंच्या आक्रमक आणि आवेगाच्या शैलीतील खेळावर टीकाही करण्यात आली. कसोटी क्रिकेटमध्ये संयमी खेळाला अधिक प्राधान्य आणि महत्त्वं दिलं जातं, हीच बाब या खेळाडूंनी जाणली पाहिजे असा सल्ला काही समालोचकांनी आणि विश्लेषकांनी दिला. कारण, त्यांच्या अतिघाईमुळं क्रमवारीत खालच्या स्थानावर फलंदाजीसाठी येणाऱ्या आणि संपूर्ण संघतील खेळाडूंच्या तणावात भर पडल्याचं चित्र ब्रिस्बेनमध्ये पाहायला मिळालं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget