एक्स्प्लोर

Ind Vs Sa 1st Test | टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय, शमी, जाडेजाची शानदार गोलंदाजी

रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याआधी टीम इंडियानं आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला होता.

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम कसोटीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय धमाकेदार विजय मिळवला आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांच्या प्रभावी माऱ्यापुढे दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच तर जाडेजाने चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव गुंडाळला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरेलेल्या आफ्रिका संघाला सुरुवातीपासूनच सावरता आले नाही.  आफ्रिकेकडून तळाचा फलंदाज  डेन पिडीटने टिच्चून फलंदाजी करत 56  धावा केल्या तर मुथुस्वामी 49 धावांवर नाबाद राहिला. हे दोघे वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर  तग धरु शकला नाही. रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याआधी टीम इंडियानं आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला होता. सलामीच्या रोहित शर्मानं दुसऱ्या डावातंही शानदार शतक झळकावलं होतं. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं. तर चेतेश्वर पुजारानं 81 धावांची खेळी उभारली होती. आर. अश्विनची 'वेगवान' कामगिरी, मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी चौथ्या दिवशी आफ्रिकेचा पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गरला पायचीत पकडत आफ्रिकेला पहिला धक्का दिला होता. डे-ब्रूनला बाद करत आश्विनने अखेरच्या दिवशी भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर मोहम्मद शमीने बावुमाचा शून्यावर त्रिफळा उडवला. यानंतर कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि एडन मार्क्रम यांनी छोटेखानी भागीदारी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमीने कर्णधार डु-प्लेसिसला बाद करत पुन्हा धक्का दिला. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, केशव महाराज हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. पिडीट आणि मुथुस्वामी यांनी अखेरच्या षटकांमध्ये भागीदारी रचत भारताचा विजय लांबणीवर टाकला. अखेर रबाडाला यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून झेलबाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

महत्त्वाच्या बातम्या

David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget