एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेळ आली आहे, कोणीही दबाव टाकण्याआधी धोनीने निवृत्त व्हावं : सुनील गावस्कर
भारताचे माजी क्रिकेटर लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला निवृत्तीबाबत सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला निवृत्तीबाबत सल्ला दिला आहे. गावस्कर म्हणाले की, धोनीने आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. कोणीही त्याच्यावर निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकण्यापूर्वी धोनीने स्वतःहून निवृत्त व्हायला हवे.
गावस्कर म्हणाले की, भारतीय क्रिकेटनं आता धोनीच्याही पुढे विचार करणं गरजेचं आहे. आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात युवा शिलेदारांना अधिकाधिक संधी द्यायला हवी. गावस्कर यांनी या विश्वचषकासाठी धोनीऐवजी रिषभ पंतला पसंती दिली आहे.
गावस्कर म्हणाले की, धोनीनं भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. पण आता धोनीच्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे आपण धोनीच्या पुढेही विचार करायला हवा. यष्टीरक्षक म्हणून, फलंदाज म्हणून नव्या खेळाडूंना संधी मिळायला हवी.
टीम इंडिया नुकताच वेस्ट इंडिज दौरा पूर्ण करुन मायदेशी परत आली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांसोबतच्या मालिकांमध्ये धोनी भारतीय संघात नाही. अनेक क्रीडा समीक्षक आणि माजी खेळाडूंनी धोनीला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यात आता सुनील गावस्कर यांची भर पडली आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने धोनीच्या निवृत्तीबाबातची मतं फेटाळली आहेत. विराट म्हणाला की धोनीचं वय हा केवळ आकडा आहे. अनेक खेळाडूंनी याआधी हे सिद्ध केलं आहे. स्वतः धोनीनेदेखील हे सिद्ध केलं आहे. तुम्हाला पटेल अथवा नाही, परंतु अनुभव महत्त्वाचा असतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement