एक्स्प्लोर
वनडेपाठोपाठ टी-20 मालिका जिंकण्याचीही टीम इंडियाकडे नामी संधी
विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ टी-20 सामन्यांच्या मालिकेवरही निर्विवाद वर्चस्व गाजवायला सज्ज झाली आहे.

सेन्चुरियन : विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ टी-20 सामन्यांच्या मालिकेवरही निर्विवाद वर्चस्व गाजवायला सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला दुसरा टी-20 सामना उद्या (बुधवार) सेन्चुरियनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहली हा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं वृत्त आहे. पहिल्या सामन्यात विराटला क्षेत्ररक्षण करताना झालेली दुखापत गंभीर नसल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. जोहान्सबर्गच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा २८ धावांनी पराभव केला होता. आता सेन्चुरियनचा सामना जिंकून, टी-20च्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याची भारताला नामी संधी आहे.
आणखी वाचा























