एक्स्प्लोर
चेन्नईत 'करुण'सह भारतानंही रचला विक्रम...
चेन्नई: भारताचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरच्या त्रिशतकी खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत 759 धावांवर डोंगर रचला आहे. पहिल्या डावात भारतानं तब्बल 282 धावांची आघाडी घेतली आहे. या कसोटीत अनेक विक्रमही मोडीत निघाले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची एका डावातील सर्वाधिक धावसंख्या 726 होती. मात्र हा विक्रमही आज मोडीत निघाला.
करुण नायर हा आपल्या पहिल्याच कसोटी शतकाचं त्रिशतकात रुपांतर करणारा आजवरचा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
याच विक्रमासोबत भारतानं एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडीत काढला आहे. भारतानं इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 759 धावा केल्या. त्याआधी भारतानं 2009 साली मुंबईच्या ब्रेबॉर्नमध्ये श्रीलंकेविरुद्ध 726 धावा केल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात भारताच्या आजवरच्या सर्वाधिक धावा
1. भारत 759/7 वि. इंग्लंड चेन्नई 2016
2. भारत 726/9 वि. श्रीलंका मुंबई 2009
3. भारत 707 वि. श्रीलंका कोलंबो 2010
4. भारत 705/7 वि. ऑस्ट्रेलिया सिडनी 2004
5. भारत 676/7 वि. श्रीलंका कानपूर 1986
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement