एक्स्प्लोर
पहिल्या वन डेत टीम इंडियाची विजयी सलामी
मुंबई: धोनीच्या टीम इंडियानं धर्मशालाच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर सहा विकेट्सनी मात करून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक तंबूत पाठवत, अख्खा डाव 190 धावांत गुंडाळला. त्यामुळं भारताला विजयासाठी 191 धावांचं माफक लक्ष्य मिळालं. विराट कोहलीच्या नाबाद 85 धावांच्या खेळीमुळं भारतानं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
त्याआधी भारतीय गोलंदाजांसमोर किवींची अक्षरश: दाणादाण उडाली. हार्दिक पंड्यानं तीन विकेट्स काढून आपलं वन डे पदार्पण दिमाखात साजरं केलं. तर अमित मिश्रानंही न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
या सामन्यात विराट कोलहीने नाबाद 85, अजिंक्य राहणेने 33, कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 21, मनिश पांडे 17, रोहित शर्मा 14 तर केदार जाधवने 10 धावा ठोकल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीनी चांगली कामगिरी केली.
न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि टीम साऊदीने चांगली भागिदारी करुन न्यूझीलंडची धावसंख्या 190 वर नेली. या सामन्यात टॉम लॅथमने 79 तर टीम साऊदीने 55 धावा ठोकल्या. डग ब्रेसवेल, जेम्स नीशॅम, आणि इश सोधीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement