(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND W vs BAR W: भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक, बार्बाडोसला 100 धावांनी नमवलं
IND W vs BAR W: भारताची गोलंदाज रेणुका सिंहच्या (Renuka Singh) भेदक माऱ्यापुढं बार्बाडोसचा संघानं (India Women vs Barbados Women) गुढघे टेकले.
IND W vs BAR W: भारताची गोलंदाज रेणुका सिंहच्या (Renuka Singh) भेदक माऱ्यापुढं बार्बाडोसचा संघानं (India Women vs Barbados Women) गुढघे टेकले. भारतानं दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या बार्बाडोस संघ 20 षटकात 61 धावांच करू शकला. या विजयासह भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. तर, पराभवामुळं बार्बाडोसच्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.
रेणुका सिंहचा भेदक मारा
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघ 62 धावापर्यंतचं मज मारू शकला. या सामन्यात बार्बाडोसकडून किसिया नाइटनं सर्वाधिक 16 धावांची खेळी केली. त्यानंतर बार्बाडोसच्या एकही फलंदाला 15 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं बार्बाडोसला 100 धावांनी विजय पत्कारावा लागला. भारताकडून रेणुका सिंहनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मेघना सिंह, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
शेफाली वर्मा आणि जेमिमानं संघाचा डाव सावरला
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 162 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मानं 26 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जनं 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. जेमिमाचं हे सातवं अर्धशतक होतं. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली. दीप्ती शर्मानंही नाबाद 34 धावांचं योगदान दिलं.
भारताचं जबरदस्त कमबॅक

हे देखील वाचा-