एक्स्प्लोर

IND Vs SA | कर्णधार विराट कोहलीचं शतक, रिकी पॉण्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने 173 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीत 16 चौकारांचा समावेश आहे.

पुणे : कर्णधार म्हणून आपला 50व्या कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने दमदार शतकाची नोंद केली. त्याच्या कारकीर्दीचं हे 26वं कसोटी शतक आहे. दहा डावांनंतर शतक करण्यात त्याला यश आलं आहे. विराटने याआधी डिसेंबर 2018 मध्ये पर्थ कसोटीत शतक ठोकलं होतं. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने 173 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीत 16 चौकारांचा समावेश आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 19-19 शतकांची नोंद आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ 25 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं 25 शतकं : ग्रॅमी स्मिथ 19 शतकं : रिकी पॉण्टिंग/विराट कोहली 15 शतकं : अॅलन बॉर्डर/स्टीव्ह वॉ/स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 26 शतकं करण्याच्या बाबतीत डॉन ब्रॅडमन, स्टीव्ह स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. ब्रॅडमन यांनी 69, स्मिथने 121 आणि सचिनने 136, तर विराटने 138 डावांमध्ये 26 शतकं केली आहेत. सर्वात कमी डावात 26 कसोटी शतकं 69 डाव : डॉन ब्रॅडमन 121 डाव : स्टीव्ह स्मिथ 136 डाव : सचिन तेंडुलकर 138 डाव : विराट कोहली 144 डाव : सुनील गावसकर 145 डाव : मॅथ्यू हेडन महेंद्रसिंह धोनीनंतर 50 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्त्व करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. कोहलीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हा मान मिळवला. विराट कोहली आधी माजी कर्णधार सौरव गांगुलीसह (कर्णधार म्हणून 49 कसोटी) संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर होता. महेंद्र सिंह धोनीने 2008 पासून 2014 पर्यंत 60 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG ODI Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Embed widget