IND vs SA U-19 World Cup: कसोटी मालिकेत आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचा वचवा भारताच्या अंडर 19 संघानं काढला आहे. 2022 अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अंडर 19 नं दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयाचे शिल्पकार राहिले कर्णधार यश धुल आणि गोलंदाज विक्की ओस्तवाल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय संघानं 46.5 षटकांमध्ये सर्वबाद 232 धावा केल्या.
233 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा 45.4 षटकात 187 धावांवर गुंडाळला. भारताकडून विक्कीनं शानदार गोलंदाजी कर पाच विकेट्स घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 11 धावात दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर शेख रशीद आणि कर्णधार यश धुलनं 71 धावांची भागिदारी करत डाव सांभाळला. रशीदनं 31 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर यशनं निशांत सिंधु, राज बावा आणि कौशल तांबेसोबत छोट्या छोट्या भागिदाऱ्या करत संघाला दोनशेपार धावसंख्या गाठून दिली. यश82 धावांवर धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव 232 धावांवर आटोपला. भारताकडून यशनं 82, रशिदनं 31, निशांत सिंधु 27, राज बावा 13 तर कौशल तांबेनं 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टनं तीन तर अफिवे नियांडा आणि डेवाल्ड ब्रेविसनं दोन दोन विकेट्स घेतल्या.
233 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. शून्यावर पहिली विकेट राजवर्धन हंगरगेकरनं घेतली. आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसनं सर्वाधिक 65 धावा केल्या. तर कर्णधार जॉर्ज वान हिर्डेननं 36 धावा केल्या. भारताकडून विक्कीने 10 षटकात 28 धावा देत 5 विकेट तर राज बावानं चार विकेट घेतल्या.
हे देखील वाचा-
- Virat Kohli च्या स्टम्प माइकवर शिव्या घालण्याच्या कृत्यावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...
- Ind vs SA, 3rd Test Highlights: आफ्रिकेला आफ्रिकेतच हरवण्याची भारताची संधी हुकली, निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
- 30 वर्ष अन् 6 कर्णधार...दक्षिण आफ्रिकामध्ये भारतीय संघ फ्लॉप, कसोटी मालिका जिंकण्यात अपयश