Gautam Gambhir On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विराट कोहली मैदानात ज्याप्रकारे भडकला आणि DRS च्या निर्णयावरुन स्टम्पजवळील माईकमध्ये ज्याप्रकारे शिव्या घातल्या, या सर्व प्रकणावर माजी सलामीवीर गौतम गंभीरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कोहलीला खडे बोल सुनावत युवा खेळाडूंसमोर अशाप्रकारे विराट रोल मॉडेल बनू शकत नाहीत, असंही तो म्हणाला आहे.
विराट, केएल राहुल आणि ऑफ स्पिनर आर अश्विन यांनी डीन एल्गर याला LBW आउट न दिल्यामुळे DRS ची मागणी केली होती. त्यानंतर देण्यात आलेल्या निर्णयावर विराटने आपला राग दर्शवत पंचासह तांत्रिक टीमलाच थेट शिव्या घातल्या होत्या. यावर स्टार स्पोटर्सशी बोलताना गौतम म्हणाला हे असं वागणं फार चूकीचं होतं. स्टम्प माइकजवळ जाऊन ज्याप्रकारे विराटने प्रतिक्रिया दिली ते एका आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला शोभत नाही असंही गंभीर म्हणाला.
काय घडलं मैदानात?
रविचंद्रन अश्विनने राऊंड द विकेटने बॉलिंग केली. अश्विनचा हा चेंडू आत वळला आणि थेट एल्गरच्या पॅडवर लागला. भारतीय टीमने जोरदार अपील केल्यानंतर अंपायरने एल्गल आऊट असल्याचा निर्णय दिला. एल्गर भारतासाठी एक महत्वाची विकेट होती.
पण एल्गरने या निर्णयावर DRS घेतला. त्यानंतर थर्ड अंपायरने एल्गर आऊट नसल्याचा निर्णय दिला. चेंडू तर स्पष्टपणे पॅडला लागला होता आणि तो खाली राहिला होता. पण थर्ड अंपायरने निर्णय याच्या उलट निर्णय दिला. नेमकं हेच कारण भारतीय संघाच्या रागाला कारणीभूत ठरलं. यामुळे अश्विन चिडला आणि स्टंपजवळ येऊन म्हणाला, "तुम्ही जिंकण्यासाठी इतर काही मार्गाचा अवलंब करा सुपरस्पोर्ट्स."
त्यानंतर विराट कोहली भलताच संतापला. तो स्टंपजवळ गेला आणि म्हणाला, "फ** कॅमेरा टीम, सुपरस्पोर्ट्स हा जोक आहे. ज्यावेळी तुमची टीम चेंडूला चमकवत असते त्यावेळी त्यांच्यावरही लक्ष ठेवत चला. फक्त विरुद्ध टीमवर लक्ष नको."
हे देखील वाचा-
- Ind vs SA, 3rd Test Highlights: आफ्रिकेला आफ्रिकेतच हरवण्याची भारताची संधी हुकली, निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
- 30 वर्ष अन् 6 कर्णधार...दक्षिण आफ्रिकामध्ये भारतीय संघ फ्लॉप, कसोटी मालिका जिंकण्यात अपयश
- West Indies vs Ireland: आयर्लंडचा वेस्ट इंडिजला दे धक्का; पाच विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha