Mumbai Local Mega Block News : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. तिकडे ट्रान्स हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान देखील मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्गाने लोकल फेऱ्या सुरु राहतील अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 


माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टटी, वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेनं आज (रविवारी) मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गानं लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. 


मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत अप आणि डाउन फास्ट मार्गावर मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकच्या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे 15 मिनिटं उशीरानं धावणार आहेत. 


हार्बर रेल्वे


हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टटी, वांद्रे दरम्यान, अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान, मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव या मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कुर्ल्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. 


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान, अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीतील जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live