IND vs SA, 3rd Test, Newlands Cricket Ground: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णयाक कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारताचं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं सात विकेट्स राखून पूर्ण केलंय. भारतानं कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातलीय.


भारताचा पहिला डाव-
या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजारानं 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटनं एका बाजूनं मोर्चा सांभाळला. पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला. त्यानंतर भारताचे फलंदाज पाठोपाठ बाद झाले. अखेर भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.  


दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव-
दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी सुरु केली असता भारताच्या जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला तंबूत धाडलं. पहिल्या दिवसाखेर आफ्रिकेची स्थिती 17 धावांवर एक बाद अशी स्थिती होती. भारताने आफ्रिकेला 210 धावांत सर्वबाद करत 13 धावांची आघाडी कायम ठेवली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताना भारताने एक विकेट मिळवली होती 17 धावांवर आफ्रिकेने खेळाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले.


भारताचा दुसरा डाव-
दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज डगमगताना दिसले. भारताचा डाव 67.3 षटकात 198 धावांवर संपुष्टात आला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले. पंतनं 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. तर आफ्रिकेकडून जानसेनने सर्वाधिक चार विकेट्स घेतले बळी घेतले. रबाडा आणि एनगिडी यांना प्रत्येकी तीन विकेट्स मिळवले. 
 
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव-
भारताला दुसऱ्या डावात डाव 198 धावांवर सर्वबाद करत 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या दिवशीच 101 धावा देखील स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे त्यांना केवळ 111 धावांची गरज होती. त्यानंतर चौथ्या दिवशी त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसननं मोर्चा सांभाळला. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन 30 धावा करून बाद झाला. मग किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या विकेट्ससाठी मोठी भागीदारी केली. पण शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीनं दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha