एक्स्प्लोर

IND vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमीला अपयश, दुसऱ्या कसोटीसाठी आवेश खानचा भारतीय संघात समावेश 

IND vs RSA 2nd Test : मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे बीबीसीआयने आवेश खानचा टीम इंडियात समावेश केलाय. फिटनेस टेस्टमध्ये मोहम्मद शमीला अपयश आलं आहे.

IND vs RSA 2nd Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज आवेश खानचा (Avesh Khan) भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. मोहम्मद शमीला (Mohammed Shami)
दुखापत झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे बीबीसीआयने (BCCI) आवेश खानचा टीम इंडियात समावेश केलाय. 

फिटनेस टेस्टमध्ये मोहम्मद शमीला अपयश

मोहम्मद शमीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, फिटनेस टेस्ट पास करण्यामध्ये त्याला अपयश आले. शमी दुखापतीमुळे सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जात असलेल्या सामन्यालाही मुकला होता. शमीच्या जागेवर खेळताना आवेश खान कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे.  बीसीसीयाने याबाबत बोलताना म्हटले की, "भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीने मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानचा संघात समावेश करण्यात आला आहे." आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळवण्यात येईल.

बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा मोठा पराभव, आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी हरवलं

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (SA vs IND ) दारुण पराभव केलाय. टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा (IND vs SA) एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेने 408 धावा करत मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली. भारताचा संपूर्ण डाव फक्त 131 धावांत संपुष्टात आला. भारताकडून एकट्या विराट कोहलीले झुंज दिली. विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंजाला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन गिल याने 26 धावा जोडल्या. पण इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. 

यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल, आर अश्विन आणि शार्दूल ठाकूर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहली आणि शुभमन गिल यांची भागिदारी सोडली, तर एकही मोठी भागिदारी होऊ शकली नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना कोणताही संधी दिली नाही. ठराविक अंतराने भारताच्या विकेट गेल्या. त्यामुळे आफ्रिकेने भारताला दुसऱ्या डावात फक्त 131 धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. डीन एल्गरने 185 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 28 चौकार मारले.

IND vs RSA 2nd Test : दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ (Team INDIA)

 रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान 

इतर महत्वाच्या बातम्या 

बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा मोठा पराभव, आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी हरवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget