एक्स्प्लोर

Kohli on WTC 2021: फायनल हरल्यानंतर विराट कोहलीकडून टीममध्ये बदलाचे संकेत, केलं मोठं वक्तव्य...

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी संघात बदलाबाबतचे संकेत दिले आहेत. विराटनं म्हटलं आहे की, संघाच्या खेळाची समीक्षा केल्यानंतर चांगल्या खेळाडूंना संघात घेतलं जाईल जे चांगल्या खेळाची चांगल्या मानसिकतेसह मैदानात उतरतील. 

IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना टीम इंडियानं गमावल्यानंतर संघावर टीका होत आहे.  टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी संघात बदलाबाबतचे संकेत दिले आहेत. विराटनं म्हटलं आहे की, संघाच्या खेळाची समीक्षा केल्यानंतर चांगल्या खेळाडूंना संघात घेतलं जाईल जे चांगल्या खेळाची चांगल्या मानसिकतेसह मैदानात उतरतील. 

कोहलीनं कुणाचंही नाव न घेत म्हटलं की, काही खेळाडू या सामन्यात रन बनवण्याचा प्रयत्नच करत नव्हते. कोहलीच्या या वक्तव्यावरुन असं लक्षात येतं आहे की, काही वरिष्ठ खेळाडूंना काही वेळ दिला जाऊ शकतो. तसेच इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाच जागा मिळेल.  

IND vs NZ, WTC 2021 Result: न्यूझीलँड कसोटीचा बादशाह! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

कोहलीनं सामना संपल्यानंतर म्हटलं होतं की, आम्ही आत्ममंथन करत आहोत. संघाच्या मजबूतीसाठी काय करावं लागेल यावर आता लक्ष केंद्रित केलं जाईल. आमच्याकडे वनडे, टी 20 साठीचा संघ मजबूत आहे. टेस्टमध्ये देखील याची गरज आहे, असं कोहली म्हणाला. 

ICC Test Rankings : आयसीसीकडून टेस्ट रँकिंग घोषित, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा नंबर वन

तो म्हणाला की, आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. संघासाठी काय महत्वाचं आहे यावर विचार केला जाईल. योग्य लोकांना खेळवणं जे चांगली खेळी करतील आणि ते देखील चांगल्या मानसिकतेसह खेळतील अशा खेळाडूंना आणावं लागेल. आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, असंही विराट कोहली म्हणाला.  

WTC फायनलमध्ये भारताचा आठ विकेट्सने पराभव

WTC अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.  भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 139 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलँडच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजांनी लवकर बाद केलं. लॅथम 9 तर कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर आलेल्या केन विलियमसन आणि रॉस टेलरनं कुठलीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. 

भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार
हा कसोटी विश्वचषकाचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Wheelchair Cricket Victory : टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
IND vs NZ 2nd Test DAY-2 Stump : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
Suryakumar Yadav News : मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget