IND vs NZ Live Updates : न्यूझीलंडचं भारतासमोर 240 धावांचं आव्हान
Background
मॅन्चेस्टर : विश्वचषकातील उपांत्य सामना आज होणार का? सगळीकडे याच प्रश्नावर चर्चा होत आहे. रिझर्व्ह डेला भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य सामन्याची क्रिकेट चाहते प्रतीक्षा करत आहेत. यादरम्यान मॅन्चेस्टरमधून हवामानाचे ताजे अपडेट्स आहेत की, तिथे आभाळ स्वच्छ आहे. रात्रीपासून तिथे पाऊस झालेला नाही. मात्र हवामान विभागाने अर्ध्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. आज सामना सुरु झाला तर न्यूझीलंडचा संघ आपली उर्वरित षटकं पूर्ण खेळेल.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानातील सामना पावसामुळे मंगळवारी थांबवून आज खेळवण्याचं ठरवलं. आज दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. विश्वचषकात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे आयसीसी क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. पाऊस नाही अशा ठिकाणी पुढचा विश्वचषक आयोजित करा, असा सल्ला क्रिकेट चाहत्यांनी दिला आहे.
सध्य आभाळ स्वच्छ, मात्र सामन्यादरम्यान पावसाची शक्यता
मॅन्चेस्टरमध्ये आज रिझर्व्ह डेला पावसाची शक्यता कायम आहे. accuweather.com नुसार मॅन्चेस्टरच्या स्थानिक वेळेनुसार 11 ते 12 च्या (भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता) दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळी 5 वाजताही (भारतीय वेळेनुसार 9.30 वाजत) पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सामना पूर्ण न झाल्यास भारत अंतिम फेरीत
आयसीसी विश्वचषकात नॉकआऊट सामन्यात रिझर्व्ह डे ची तरतूद आहे. या नियमानुसार, सामन्याच्या तारखेला जर तो पूर्ण होऊ शकला नाही, तर पुढच्या दिवशी जिथे खेळ थांबला तिथून सामन्याला सुरुवात होईल. 1999 मध्ये इंग्लंडमधील विश्वचषकात भारत आणि इंग्लंडमधील सामन्यात असाच प्रकार घडला होता. सामना पूर्ण होण्यासाठी रिझर्व्ह डेला भारतला 20 षटकांपर्यंत फलंदाजी करणं आवश्यक आहे. जर रिझर्व्ह डेलाही सामना पूर्ण झाला नाही तर भारत थेट अंतिम सामन्यात जाईल, कारण गुणतालिकेत भारत न्यूझीलंडपेक्षा पुढे आहेत. भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडची धावसंख्या 5/211 (46.1 षटक)
काल (09 जुलै) जिथे सामना थांबला होता, तिथूनच आज (10 जुलै) सामन्याची सुरुवात होईल. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडने 46.1 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 211 धावा केल्या होत्या. रॉस टेलर 67 धावा आणि टॉम लॅथम 3 धावांवर नाबाद होते. आजचा सामना याच धावसंख्येवरुन पुढे खेळवला जाईल. न्यूझीलंडचा संघ आपली उर्वरित षटकं पूर्ण करेल.
























