IND vs NZ, 3rd T20 : न्यूझीलंड 160 धावांवर सर्वबाद, कॉन्वे-फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत सावरला डाव
IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जात असून भारताने न्यूझीलंडला 160 धावांवर सर्वबाद केलं आहे.
IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड असा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि शेवटच्या षटकातही भारताने दमदार गोलंदाजी केली, पण मधल्या षटकात डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत संघाचा डाव सावरला आणि अखेर 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. भारत 161 धावा करण्यासाठी आता मैदानात उतरणार आहे.
सामन्यात नाणेफेक (Toss Update) जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने (Team India) भेदक गोलंदाजीने सुरुवात करत न्यूझीलंडचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं संयमी तसंच फटकेबाजीने सुरुवात करत संघाचा डाव सावरला. दोघांनी संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली असून डेवॉन कॉन्वेने 59 आणि ग्लेन फिलिप्सनं 54 धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज मात्र अगदी पटापट बाद होत गेले. नीशाम, मिल्ने आणि ईश सोधी हेतर शून्यावर बाद झाले. भारताच्या अर्शदीप सिंहनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सिराजनंही 4 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनही एक विकेट घेतली.
.@arshdeepsinghh put on a brilliant show with the ball and claimed a fine 4⃣-wicket haul 👏👏
— BCCI (@BCCI) November 22, 2022
Live - https://t.co/rUlivZ308H #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/bbecP4pN6h
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल. तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे. त्यामुळे आजचा सामना अगदी निर्णायक असणार आहे.
हे देखील वाचा-