एक्स्प्लोर

भारत-इंग्लंड सामन्यात 'Soft Signal'वरुन थर्ड अम्पायर वादात! काय आहे सॉफ्ट सिग्नल?

IND vs ENG: भारत-इंग्लंडदरम्यान झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल'वरुन थर्ड अम्पायर वादात आहेत. त्यावरुन थर्ड अम्पायर असा ट्रेंड देखील सुरु आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?

IND vs ENG: भारत-इंग्लंडदरम्यान झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल'वरुन थर्ड अम्पायर वादात आहेत. त्यावरुन थर्ड अम्पायर असा ट्रेंड देखील सुरु आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिका विजयासाठीचा अंतिम सामना उद्या, 20 मार्च रोजी खेळला जाणार आहे. चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला सॉफ्ट सिग्नल अंतर्गत आऊट देण्यात आलं. त्यानंतर हा वाद सुरु झाला. यावर दिग्गज खेळाडूंसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.  

या सामन्यात सूर्यकुमार यादवला सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट देण्यात आलं. मात्र त्याच्या कॅचसंदर्भात बरंच द्विधावस्था होती. त्यात चेंडू जमिनीला लागल्याचं दिसत होतं. मैदानावरील अम्पायरनं त्याला आऊट दिलं. त्यामुळं सॉफ्ट सिग्नलमध्येही आऊट असंच सांगण्यात आलं. जर मैदानावरील अम्पायरनं नॉट आऊट दिलं असतं तो बाद झाला नसता. तसंच वॉशिग्टन सुंदर बाबतही झालं.  जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर आदिल राशिदनं सीमारेषेजवळ त्याचा झेल घेतला. त्यावेळी त्याचा पाय सामारेषेला स्पर्श करत असल्याचं दिसत होतं. मात्र तिथंही सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट दिलं गेलं.  

काय आहे सॉफ्ट सिग्नल 
जर एखादा खेळाडू झेलबाद झाला आणि तो निर्णय स्पष्ट नसेल तर तो थर्ड अम्पायरकडे जातो.त्यावेळी मैदानावरील अम्पायरनं दिलेल्या निर्णयानुसार थर्ड अम्पायरला सॉफ्ट सिग्नल म्हणून आपला निर्णय द्यावा लागतो. जर कॅचसंदर्भात स्पष्ट निर्णय होऊ शकत नसेल अशा वेळी सॉफ्ट सिग्नल म्हणून थर्ड अम्पायर निर्णय देतो. अशा स्थितीत मैदानावरील अम्पायरनं दिलेला निर्णय थर्ड अम्पायर देखील कायम ठेवतात. नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर असे बदल क्रिकेटमध्ये करण्यात आले आहेत. असाच निर्णय एलबीडब्ल्यू अर्थात पायचीत बाद झाल्यानंतरही घेतला जातो. पायचीत बाद असेल तरी अम्पायर कॉल म्हणून तो रद्द केला जातो. त्यावरुनही बऱ्याचदा टीका झाली आहे. 

काय म्हणाला विराट कोहली 
काल सामना संपल्यानंतर यावर बोलताना विराट म्हणाला की, आधी कसोटी मालिकेत असाच प्रकार झाला होता, तेव्हा अजिंक्य रहाणेने कॅच पकडला होता, पण त्याला पूर्ण खात्री नव्हती. जेव्हा क्लोज कॉल असतात तेव्हा सॉफ्ट सिग्नल खूप मह्त्त्वाचे ठरतात. मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत. सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा. मत्याचा सगळ्या निर्णयावर परिणाम होत असतो. मैदानावरच सर्व स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे, अशा शब्दात विराटने सॉफ्ट सिग्नलविरोधात नाराजी व्यक्त केली.

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill: शुभमन गिलनं इतिहास रचला, विराट कोहलीचा विक्रम मोडला,कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी
शुभमन गिलनं इतिहास रचला, विराट कोहलीचा विक्रम मोडला, कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी 
IND vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालवर 5 सामन्यांची बंदी? श्रीलंकन गोलंदाजाशी LIVE सामन्यात घातला राडा; हेल्मेटने टक्कर दिली, काय सांगतो ICCचा नियम?
यशस्वी जैस्वालवर 5 सामन्यांची बंदी? श्रीलंकन गोलंदाजाशी LIVE सामन्यात घातला राडा; हेल्मेटने टक्कर दिली, काय सांगतो ICCचा नियम?
IND vs SL 2nd TEST Day-1 Day 1 Stumps : 117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget