मुंबई : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय, ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अशातच भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या दुखापतीवरुन अनेक वाद समोर येत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा समावेश न केल्यामुळे बीसीसीआयवर सर्व स्तरांतून टीका केली जात होती. परंतु, आता हा विवाद थांबणार असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माचा संघात समावेश केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भारतीय संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्स विरोधात आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची तयारी करत आहे. परंतु, बीसीसीआयने रोहित शर्मा अनफिट असल्याचं सांगत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड केली नव्हती. परंतु, रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जागा न मिळाल्यामुळे बीसीसीआयवर चौफेर टिका करण्यात येत होती. बीसीसीआयला प्रश्न विचारण्यात येत आहे की, जर रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फिच आहे, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनफिट कसा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. बीसीसीआय सुत्रांनुसार, भारतीय संघाचे फिजियो नितिन पटेल रोहित शर्माच्या दुखापतीवर लक्ष देणार असून ते रोहितवर उपचारही करणार असल्याची माहिती मिळत आहे.
वनडे सीरीजमधून बाहेर राहू शकतो रोहित
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी तीन सामन्यांमध्ये वनडे सीरीजसोबत सुरुवात होणार आहे. जवळपास दोन महिन्यांपासून अधिक काल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढती होणार आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून अधिक वेळ भारतीय संघ तीन ट्वेंटी-ट्वेंटी आणि चार कसोटी सामने खेळणार आहेत. अशातच अंदाज वर्तवण्यात येत आहे की, रोहित शर्माला झालेली दुखापत लक्षात घेता, कदाचित वनडे सीरीजमध्ये जागा मिळणार नाही. तर ट्वेंटी-ट्वेंटी सीरीजमध्ये संघात वापसी होऊ शकते.
दरम्यान, रोहित शर्मा ऐवजी केएल राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आलं आहे. परंतु, रोहित शर्माची वापसी झाल्यानंतर त्याला पुन्हा उपकर्णधार म्हणून निवडणार की, नाही याबाबत आता काही सांगू शकत नाही.
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यांच्या वेळापत्रक :
एकदिवसीय सामने
पहिला सामना- 27 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
दुसरा सामना 29 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
तिसरा सामना- 2 डिसेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
ट्वेंटी-ट्वेंटी सामने
पहिला सामना - 4 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 6 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
तिसरा सामना - 8 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
कसोटी सामने
पहिला सामना- 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर (डे-नाईट सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (पहाटे 4.30 वाजता सुरु)
तिसरा कसोटी सामना- 7 जानेवारी ते 11 जानेवारी (पहाटे 4.30 वाजता सुरु)
चौथा सामना- 15 जानेवारी ते 19 जानेवारी (पहाटे 5 वाजता सुरु)
महत्त्वाच्या बातम्या :