IPL 2020 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची निवड नाव नसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. तसेच रोहित सारख्या स्टार खेळाडूचं नाव नसल्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. अशातच आता रवी शास्त्री यांनी यावर आपलं मौनं सोडलं आहे.
रोहित शर्माची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या. जर रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फिट आहे, तर त्याला फिटनेसच्या कारणामुळे भारतीय संघातून बाहेर का ठेवण्यात आलं? असा प्रश्न सर्वांकडून सध्या विचारला जात आहे. यावर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'रोहित शर्माच्या फायद्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे.'
रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला भारतीय संघात पुनरागमन करताना अजिबात घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री यांचं म्हणणं आहे की, रोहित शर्माच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला पुन्हा दुखापत होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. शास्त्री यांनी पुढे बोलताना सांगितलं की, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान न देण्याचा निर्णय निवड समितीने त्याचा मेडिकल रिपोर्ट पाहूनच घेतला आहे.'
रवी शास्त्री म्हणाले की, 'रोहित शर्माच्या दुखापतीवर बीसीसीआयच्या मेडिकल टीमची नजर आहे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. त्यानी निवड समितीकडे एक रिपोर्ट सोपवला आहे, आणि त्यांना आपलं काम व्यवस्थित माहिती आहे.'
रवी शास्त्री यांचा यासंदर्भात कोणतीही भूमिका मांडण्यास नकार
रोहित शर्माची भारतीय संघात निवड न झाल्यासंदर्भात कोणतीही भूमिका मांडण्यास रवी शास्त्री यांनी नकार दिला आहे. रवी शास्त्री म्हणाले की, 'याप्रकरणी माझी कोणतीच भूमिका नाही. तसेच निवड समितीमध्येही माझा सहभाग नाही. मला हे ठाऊक आहे की, रोहितच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला पुन्हा दुखापत होण्याचा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये तीन टी20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. तसेच कसोटी सामनेही खेळवण्यात येणार आहे. शास्त्रींनी रोहितला सल्ला दिला आहे की, रोहितने पुन्हा तिच चूक करु नये जी त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला केली होती.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये मागील काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर आहे. परंतु, आयपीएलच्या प्लेऑफमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघात वापसी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
टी -20 संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या :
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; दुखापतग्रस्त रोहित शर्मा, ईशांत शर्माचा समावेश नाही