IND vs AUS, India Playing 11 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा, 'या' दोन खेळाडूंचं कसोटी पदार्पण
IND vs AUS: 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया उद्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं हे कसोटी पदार्पण असणार आहे.
IND vs AUS: 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया उद्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे दोन खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहेत. पहिल्या सामन्यात झालेला मानहानीकारक पराभवानंतर हा सामना जिंकण्याचं आव्हान घेऊन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनं एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत विकेटकीपर असेल तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं हे कसोटी पदार्पण असणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन- अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.ALERT????: #TeamIndia for 2nd Test of the Border-Gavaskar Trophy against Australia to be played in MCG from tomorrow announced. #AUSvIND pic.twitter.com/4g1q3DJmm7
— BCCI (@BCCI) December 25, 2020
विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन आहे. मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. अॅडलेड येथील प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला.
वाचा : Aus vs Ind 1st Test | पृथ्वी शॉ पुन्हा फ्लॉप; मीम्सचा पाऊस पाडत नेटकऱ्यांनी झोडपलं
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी क्रिकेटमधील भारताची नीचांकी धावसंख्या नोंदवली. त्यातच कोहली आता पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतला आहे. संघात जाडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे. तरी देखील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे.
मोहम्मद शमीच्या जागी खेळणार 'हा' खेळाडू, करणार कसोटी पदार्पण
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो. सिराजनं सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती.
Boxing day test: कसं पडलं 'बॉक्सिंग डे टेस्ट' नाव, काय आहे यामागचा इतिहास?