IND vs AUS, CWG 2020 Final: सुवर्णपदक जिंकण्यापासून भारतीय महिला क्रिकेट संघ 162 धावा दूर
IND vs AUS T20, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेतील अंतिम (CWG 2022 Final) सामना खेळला जात आहे.
IND vs AUS T20, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेतील अंतिम (CWG 2022 Final) सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 161 धावांवर रोखलंय. तर, भारताला विजयासाठी 20 षटकात 162 धावा कराव्या लागतील.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये कॉमनवेल्थ 2022 चा अंतिम सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया महिला संघाचा कर्णधार मेग लेनिंगनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दरम्यान, संघाचा स्कोर 9 असताना ऑस्ट्रेलियानं टीमनं हिलीच्या रूपात पहिली विकेट गमावली. यानंतर मूनी आणि लेनिंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार 36 धावांवर धावबाद झाली. ताहलिया मॅकग्राही पुढच्याच षटकात आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं भारतासमोर सुवर्णपदक जिंकण्यासाठी 162 धावांचं लक्ष्य ठेवलंय. भारताकडून रेणुका सिंह आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतली. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
संघ-
भारतीय संघ:
स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, मेघना सिंह, रेणुका सिंह.
ऑस्ट्रेलिया संघ:
अलिसा व्हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
हे देखील वाचा-