Junior Hockey World Cup : यंदा भारतात पार पडणाऱ्या ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपमध्ये (Junior Hockey World Cup) भारतीय हॉकी संघ दमदार कामगिरी करत आहे. ओदिशामध्ये या भव्य स्पर्धेसाठी विशेष मैदान तयार करण्यात आले आहेत. दरम्यान उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं (Indian Hockey Team) बेल्जियमला 1-0 ने मात देत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता सेमीच्या सामन्यात भारत जर्मनीविरुद्ध भिडणार आहे. 


भारतीय हॉकी संघाची स्पर्धेतील सुरुवात तशी खास झाली नव्हती. सुरुतीच्या सामन्यातच भारत फ्रान्सकडून 4-5 ने पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमने पुढील तिन्ही सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केलं. क्वॉर्टरफायनलमध्ये बेल्जियमला मात देत भारताने दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारताने दमदार डिफेन्सच्या जोरावर बेल्जियमला मात दिली आहे.


असा पार पडला सामना


बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलकिपर आणि डिफेन्समधील खेळाडूंनी सर्वात भारी कामगिरी केली. भारताचे दोन्ही गोलकीपर प्रशांत चौहान आणि पवन नेबाव यांनी मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी केली. तर श्रद्धानंद तिवारी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारताने हाल्फ टाईमपूर्वी सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली, जी अखेरपर्यंत कायम राहिली आणि भारत सामन्यात 1-0 ने जिंकला.



आता सामना जर्मनीशी


बेल्जियमला मात दिल्यानंतर आता भारताची लढत बलाढ्य जर्मनीशी असणार आहे. शुक्रवारी हा सामना खेळवला जाणार आहे. तर दुसरीकडे फ्रान्स आणि अर्जेंटीना यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही सामन्यांतून विजयी संघ फायनलमध्ये आमने सामने भिडणार आहे. 



संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha