IPL Retention: आयपीएल 2022 चं काउंटडाउन आजपासून (30 नोव्हेंबर 2021) सुरू झालंय. आयपीएलमधील फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे पाठवण्याची आज दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, आज प्रत्येक फ्रेंचायझी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केले. यानंतर लीगमध्ये समाविष्ट केलेल्या दोन नवीन संघांना अहमदाबाद आणि लखनौच्या संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनचं वेळापत्रक ठरवण्यात येईल. आयपीएलच्या पुढील हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझींची ऍन्ट्री झालीय. यामुळं आयपीएलचा पुढील हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे.
फ्रेंचायझी त्यांच्या संघातील फक्त चार खेळाडूंना रिटेन करू शकतात. ज्यात तीन पेक्षा जास्त भारतीय आणि दोन पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. तर, लखनौ आणि अहमदाबाद दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी 3 खेळाडू निवडण्याची संधी दिली जाईल
रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-
रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी)
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल सामद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रविंद्र जाडेजा (16 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) अॅनरिच नॉर्टीजे (6.50 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) सुनील नारायण (6 कोटी)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात भारतात झाली होती. मात्र, काही संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. त्यानंतर 2020 मध्ये झालेली 13 व्या हंगामातील उर्वरित सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. परंतु, आयपीएलचा 15 वा हंगाम भारतातच पार पडणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Rahul Tewatia Marriage : ऑलराउंडर राहुल तेवतियाची पडली विकेट, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर
- Ind vs NZ, Mumbai Test : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी विराट संघात परतणार, कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार?, अशी असेल भारताची अंतिम 11
- Messi Wins Ballon d'or : जग्गजेता मेस्सी... सातव्यांदा पटकावला प्रतिष्ठेचा 'बॅलन डी'ओर