Junior Hockey World Cup : यंदाचा ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप  (Junior Hockey World Cup) भारतात पार पडत आहे. ओदिशामध्ये खास ग्राऊंड्स यासाठी तयार करण्यात आले आहेत. दरम्यान यजमान भारतीय हॉकी संघानं (Indian Hockey Team) देखील उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) जागा मिळवली आहे. भारताने याआधी पूल-बीमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात पोलंडला 8-2 अशा मोठ्या फरकानं नमवलं होतं. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असल्यामुळे आजच्या सामन्यातही भारताच्या जिंकण्याच्या आशा अधिक आहेत.


खडतर सुरुवातीनंतर भारत रुळावर


स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फ्रान्सकडून पराभव पत्करल्यानंतर भारताला क्वॉर्टर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणं गरजेचं होतं. भारतानं ग्रुपच्या दुसऱ्या सामन्यात कॅनडाला 13-1 च्या फरकानं पराभूत करुन क्वॉर्टर फायनल्समध्ये आपली जागा पक्की केली आहे. पोलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर करो या मरोची परिस्थिती होती. ज्यात विजय मिळवत भारत आज उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. बेल्जियम गेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्डकपमध्ये उपविजेता संघ होता. भारतीय संघाचं बेल्जियमला फायनल्समध्ये पराभूत केलं होतं. 


सामना कधी आणि कुठे?


सामना आज सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ओदिशातील कलिंगा हॉकी मैदानावर खेळवला जाणार आहे. तुम्ही घरबसल्या हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स1 एचडीवर पाहता येणार आहे.



संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha