एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : 'मेन इन ब्लू' विश्वचषकात भगव्या रंगात खेळणार

भारतासह यजमान इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांची पारंपरिक जर्सीही निळ्या रंगाची आहे.

मुंबई : 'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. मात्र आयसीसीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. आगामी विश्वचषकात टीम इंडियाच्या पर्यायी जर्सीचा रंग निळा आणि भगवा असेल. टीम इंडियाच्या वन डे सामन्यांसाठीच्या पारंपरिक जर्सीचा रंग निळा आहे. त्यातही कॉलरवर आणि पाठीवरच्या नाव-क्रमांकासाठी भगव्या रंगाचा मोजका वापर आहे. पण विश्वचषकातल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडिया पर्यायी म्हणजे निळ्या आणि भगव्या रंगाच्या नव्या जर्सीत खेळणार आहे. कधी वेगळ्या रंगाची जर्सी घालणार? भारतासह यजमान इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांची पारंपरिक जर्सीही निळ्या रंगाची आहे. आयसीसीच्या प्रस्तावानुसार, दोन्ही संघांची पारंपरिक जर्सी एकाच रंगातली असल्यास, अवे सामना खेळणारा संघ पर्यायी रंगाच्या जर्सीत दिसेल. याचा सरळ अर्थ असा की, भारतीय संघ जेव्हा इंग्लंड, अफगाणिस्तान खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा खेळाडूंची जर्सी भगव्या रंगाची असेल. तर श्रीलंकेसह इतर देशांविरुद्ध भारतीय संघ आपल्या पारंपरिक निळ्या जर्सीमध्ये दिसेल. तर यजमान इंग्लंड संघाची जर्सी मात्र तिच असेल. दोन रंगांचा पर्याय सध्याचा जमाना हा टेलिव्हिजनचा आहे. टेलिव्हिजनवरचं प्रक्षेपण अधिक 'रंगत'दार व्हावं म्हणून आयसीसीने होम आणि अवे अशा दोन जर्सींचा प्रस्ताव ठेवला आहे. आयसीसीसीच्या दफ्तरी टीम इंडियाच्या जर्सी कलरची ब्लू ॲण्ड ऑरेंज अशी आधीपासूनच नोंद आहे. त्यामुळे अवे सामन्यांसाठी बीसीसीआयकडून गडद निळ्या आणि भगव्या रंगाचा पर्याय देण्यात आला आहे. या तीन संघांनाही जर्सीचा रंग बदलावा लागणार याशिवाय पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तीन संघांची जर्सी हिरव्या रंगाची आहे. त्यामुळे त्यांनीही काही सामन्यांसाठी वेगळ्या रंगाची जर्सी वापरावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया, विंडीज, न्यूझीलंडची युनिक जर्सी तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांच्या जर्सीचा रंग युनिक आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या रंगाच्या जर्सीची गरज भासणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget