एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 | "मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय", जाडेजा मांजरेकरांवर भडकला

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने संजय मांजरेकर यांना चांगलंच सुनावलं. जाडेजाने ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला.

मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करणं क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांच्या अंगाशी आलं आहे. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर मांजरेकर यांनी काही खेळाडूंवर निशाणा साधला होता. यानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने संजय मांजरेकर यांना चांगलंच सुनावलं. जाडेजाने ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला. काय आहे प्रकरण? 30 जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभ झाला होता. भारताचा हा विश्वचषकातील पहिला पराभव ठरला. या पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या समावेशाचे संकेत दिले होते. परंतु जाडेजाच्या संघात सामील होण्याच्या वृत्तावर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "तुकड्यांमध्ये परफॉर्म करणाऱ्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहू शकत नाही. तुकड्या-तुकड्यांमध्ये परफॉर्म करणारे खेळाडू मला आवडत नाही, जसा की सध्या रवींद्र जाडेजाचा वनडेतील परफॉर्मन्स. मला एकतर गोलंदाज आवडेल किंवा फलंदाज." रवींद्र जाडेजाचं उत्तर संजय मांजरेकर यांच्या कमेंटवर रवींद्र जाडेजा भडकला. त्याने ट्वीट करुन मांजरेकर यांना खडेबोल सुनावले. संजय मांजरेकर यांना मेंशन करुन जाडेजाने लिहिलं की. "मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काही कमावलं आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका. मी तुमच्या 'व्हर्बल डायरिया' बाबत खूप ऐकलं आहे." दरम्यान, रवींद्र जाडेजाने यंदाच्या विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. पण बदली खेळाडू म्हणून त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. त्याने 151 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करुन 2035 धावा केल्या असून 174 विकेट्स घेतल्या आहे. तर मांजरेकर यांनी 74 वनडे सामन्यात 1994 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे. धोनीवर टीका मांजरेकरांना महागात दुसरीकडे स्ट्राईक रेट आणि स्ट्राईक रोटेट न केल्याने महेंद्र सिंह धोनीवर टीका केल्याप्रकरणी संजय मांजरेकर यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. 2019 च्या विश्वचषकात आतापर्यंत धोनीचा स्ट्राईक रेट धीमा आहे. धोनीच्या खेळीबाबतही संजय मांजरेकर यांनी ट्वीट केलं होतं.  फिरकीविरोधात धोनीच्या स्ट्राईक रेटवरुनही संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget