एक्स्प्लोर
Advertisement
ICC World Cup 2019 : विश्वचषकात प्रत्येक संघासोबत अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती
क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.
मुंबई : इंग्लंडमधला आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वाचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व दहा संघासोबत आयसीसीकडून एक अॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयसीसीच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एकेक अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असे. पण आगामी विश्वचषकापासून प्रत्येक संघावर नजर ठेवण्यासाठी सराव सामन्यांपासून त्या संघाच्या विश्वचषकातल्या अखेरच्या सामन्यापर्यंत, एकच अधिकारी त्या संघासोबत राहणार असल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.
आयसीसी विश्वचषक 2019 मधील सर्व दहा संघ आणि त्यांचे खेळाडू
याआधी आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी युनिट सामन्याच्या स्थळी हजर राहत होतं. यामुळे संघाला अनेक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावं लागत होतं. परंतु आता प्रत्येक संघासोबत एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, सराव सामन्यापासून स्पर्धा संपेपर्यंत संघासोबतच राहिल.
डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा मुक्कामही त्या त्या संघाच्या हॉटेलमध्येच राहिल. विश्वचषकाला भ्रष्टाचार आणि फिक्सिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसीसीने ठोस पाऊल उचललं आहे.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 ची सुरुवात 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होत आहे. यामध्ये एकूण दहा संघांमध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 14 जुलै रोजी होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी
संबंधित बातम्या
ICC WORLD CUP 2019 : विश्वचषकापर्यंत केदार जाधव फिट नसल्यास 'या' पाचपैकी एकाला मिळणार संधी
विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड
World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement