एक्स्प्लोर
9 नोव्हेंबरपासून महिला टी20 विश्वचषक, पाहा संपूर्ण वेळापत्रक
या विश्वचषकात सलामीलाच भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

मुंबई : सहाव्या आयसीसी महिला ट्वेण्टी20 विश्वचषकाचं वेस्ट इंडीजमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. 9 ते 24 नोव्हेंबरदरम्यान वेस्ट इंडिजमध्ये महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या विश्वचषकात सलामीलाच भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर स्मृती मानधना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. भारताच्या या संघात अनुभवी मिथाली राजसह मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्स आणि महाराष्ट्राच्या अनुजा पाटीलचाही समावेश आहे. भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रोड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दिप्ती शर्मा, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिस्त, डी हेमलता, मानसी जोशी, पूजा वास्त्राकार आणि अरुंधती रेड्डी
महिला ट्वेण्टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक
9 नोव्हेंबर, शुक्रवार ग्रुप ब - पहिला सामना, न्यूझीलंड विरुद्ध भारत, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 8:30 वाजता 10 नोव्हेंबर, शनिवार ग्रुप ब - दुसरा सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 10 नोव्हेंबर, शनिवार ग्रुप अ - तिसरा सामना, वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 11 नोव्हेंबर, रविवार ग्रुप अ - चौथा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, रात्री 8 वाजता 11 नोव्हेंबर, रविवार ग्रुप ब - पाचवा सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 8:30 वाजता 12 नोव्हेंबर, सोमवार ग्रुप ब- सहावा सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 13 नोव्हेंबर, मंगळवार ग्रुप अ - सातवा सामना, इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, रात्री 1:30 वाजता 13 नोव्हेंबर, मंगळवार ग्रुप अ - आठवा सामना, श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, पहाटे 5:30 वाजता 14 नोव्हेंबर, बुधवार ग्रुप ब - नववा सामना, पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 14 नोव्हेंबर, बुधवार ग्रुप ब - दहावा सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, प्रोव्हेडन्स स्टेडियम, गुयाना, पहाटे 5:30 वाजता 15 नोव्हेंबर, गुरुवार ग्रुप अ - अकरावा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम रात्री 1:30 वाजता 15 नोव्हेंबर, गुरुवार ग्रुप अ - बारावा सामना, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, पहाटे 5:30 वाजता 16 नोव्हेंबर, शुक्रवार ग्रुप ब - तेरावा सामना, भारत विरुद्ध आयर्लंड, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 8:30 वाजता 16 नोव्हेंबर, शुक्रवार ग्रुप ब - चौदावा सामना, न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 17 नोव्हेंबर, शनिवार ग्रुप अ - पंधरावा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, रात्री 1:30 वाजता 17 नोव्हेंबर, शनिवार ग्रुप अ - सोळावा सामना, वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, पहाटे 5:30 वाजता 17 नोव्हेंबर, शनिवार ग्रुप ब - सतरावा सामना, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 8:30 वाजता 18 नोव्हेंबर, रविवार ग्रुप ब - अठरावा सामना, न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गुयाना, रात्री 1:30 वाजता 19 नोव्हेंबर, सोमवार ग्रुप अ - एकोणिसावा सामना, वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, रात्री 1:30 वाजता 20 नोव्हेंबर, सोमवार ग्रुप अ - विसावा सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश,डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, पहाटे 5:30 वाजता पहिला उपांत्य सामना - 23 नोव्हेंबर सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साऊंड, अँटिगा दुपारी 1:30 वाजता दुसरा उपांत्य सामना - 23 नोव्हेंबर सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साऊंड, अँटिगा पहाटे 5:30 वाजता अंतिम सामना - 25 नोव्हेंबर सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साऊंड, अँटिगा पहाचे 5:30 वाजताआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























