एक्स्प्लोर
पृथ्वी शॉ कर्णधार, अंडर 19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ रवाना
पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची टीम इंडिया दोन्ही संघ पहाटे 4 वा मुंबई विमानतळावरुन दुबईसाठी रवाना झाले.
मुंबई: अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. या विश्वचषकासाठी भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी मुंबईच्या पृथ्वी शॉच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची टीम इंडिया दोन्ही संघ पहाटे 4 वा मुंबई विमानतळावरुन दुबईसाठी रवाना झाले. दुबईवरुन कोहलीचा संघ दक्षिण आफ्रिकेसाठी तर पृथ्वी शॉची टीम न्यूझीलंडसाठी रवाना झाली.
राहुल द्रविडची संघबांधणी
अंडर19 संघाची बांधणी द वॉल राहुल द्रविडने केली आहे. या संघाच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड धुरा सांभाळत आहे.
प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मासारख्या फलंदाजांसोबत खेळण्याची मिळणारी संधी, तसंच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचं मार्गदर्शन याचा अंडर नाईन्टिन विश्वचषकात लाभ होईल, असं कर्णधार पृथ्वी शॉने सांगितलं.
येत्या 13 जानेवारीपासून अंडर 19 विश्वचषकाला सुरुवात होईल. 14 जानेवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना होईल.
भारतीय संघ
India U19 Squad: पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमन गिल, मनज्योत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, हार्विक देसाई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पोरेल, अनुकुल सुधाकर रॉय, शिवा सिंग, आर्यन जुयल, पंकज यादव, अर्शदीप सिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement