एक्स्प्लोर
Dhoni Gloves Row | ICC चा स्पष्ट नकार, धोनीच्या बॅजवाल्या ग्लोव्ह्जना मनाई
धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली होती.
मुंबई : महेंद्रसिंग धोनीला आगामी सामन्यामध्ये त्याचे बॅजवाले ग्लोव्ह्ज बदलावे लागणार आहेत. धोनीला ग्लोव्ह्ज वापरण्यासाठी परवानगी द्यावी, यासंदर्भात बीसीसीआयने केलेलं अपील आयसीसीने फेटाळून लावलं आहे. धोनीच्या ग्लोव्ह्जवर पॅराकमांडोजच्या बलिदान लोगोशी साधर्म्य असलेल्या लोगोवर आयसीसीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
'धोनी किप दी ग्लोव्हज' असं म्हणत समस्त देश माहीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. पाकिस्तानी टीमने क्रिकेटच्या मैदानात नमाज अदा करत ज्यू आणि ख्रिश्चनांना बदनाम करणं आयसीसीला चालतं, पण महेंद्रसिंह धोनीचे प्रतिकात्मक ग्लोव्हज चालत नाहीत? असा सवालही उपस्थित करण्यात आला होता.
सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केलं आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली होती.
MS Dhoni gloves | धोनीचा बॅज आयसीसीला का खटकतोय? | माझा विशेष
ग्लोव्ह्ज, लोगो आणि आयसीसीचे नियम
उत्पादकांचे दोन डिझाईन लोगो वापरण्यास आयसीसीची अनुमती
राष्ट्रीय लोगो, व्यापारी लोगो, इव्हेंट लोगो, चॅरिटी लोगो प्रिंट करण्यासही परवानगी
धोनीच्या ग्लोव्ह्जवरील लोगो यापैकी कोणत्याही प्रकारात बसत नसल्याने आयसीसीचा आक्षेप
धोनीच्या ग्लोव्हजवरील बॅज हा आयसीसीसाठी फक्त नियमांचा विषय असला, तरी 130 कोटी भारतीयांसाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे. त्यामुळे ग्लोव्ह्जवरील बॅज काढला, तरी मनात देशभक्तीची ज्योत कायम तेवत राहील, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement